Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याचाच अर्थ धनंजय मुंडे कराडला वाचवत आहेत, राजीनामा द्याच; आता नरेंद्र पाटील यांचा घरचा आहेर

महंतांच्या निर्णयावर मला काहीच बोलायचं नाही. मात्र पोलीस यंत्रणांना चौकशी करू द्या. तपास करू द्या. कुणी कुणाला गुन्हेगार हे ठरवत नसतं. गुन्हेगारा सोबत संबंध ठेवण, गुन्हेगारांशी संबंधित व्यक्तीवर कारवाई करू नका अशा सूचना पोलिसांना देणं... हा सगळा चौकशीचा भाग आहे आणि चौकशी झाल्यानंतर पोलीस विभाग सुद्धा क्लीनचिट देईलच, असं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले.

याचाच अर्थ धनंजय मुंडे कराडला वाचवत आहेत, राजीनामा द्याच; आता नरेंद्र पाटील यांचा घरचा आहेर
dhananjay munde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 4:46 PM

किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव : भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या पाठचा ससेमिरा अद्याप गेलेला नाही. आता भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी धनंजय मुंडे यांना घरचा आहेर दिला आहे. एवढं सर्व प्रकरण झालेलं असताना धनंजय मुंडे हे कराडच्या परळी येथील कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेत होते. याचा अर्थ धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सांगत नरेंद्र पाटील यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नरेंद्र पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या दोघांचीही मागणी योग्य असल्याचं सांगत नरेंद्र पाटील यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. आपला सहकारी किंवा पार्टनर एखाद्या प्रकरणात अडकला असेल तर, मुंडे यांनी लगेच बाजूला व्हायला हवं होतं, असा सल्लाही नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

दमानिया, धस यांचे आरोप योग्यच

एवढं प्रकरण झालेलं असताना मुंडे हे वाल्मिक कराडच्या परळी येथील कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेत आहे. याचा अर्थ मुंडे हे कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचमुळे अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी अतिशय रास्त आहे. आता मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असं नरेंद्र पाटील म्हणाले.

एका मंत्र्यासाठी शपथविधी होऊ शकतो

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर कुठलाही दबाव राहणार नाही. चौकशी चांगल्या पद्धतीने होईल. पारदर्शक होईल. तसेच या प्रकरणातील सत्यही बाहेर पडेल. प्रकरणातील सत्य बाहेर आल्यावर आणि निर्दोष असेल तर धनंजय मुंडे यांनी खुशाल परत मंत्रिपदाची शपथ घ्यावी, असं सांगतानाच आजकाल पहाटे, संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी केव्हाही शपथविधी होतच असतो. त्यामुळे एका मंत्र्यासाठी पुन्हा शपथविधी होऊ शकतो, असा टोला त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

एक दोन महिन्यांचाच प्रश्न

चौकशीमध्ये जर धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख होत असेल तर त्यांनी पदापासून अलिप्त राहावं. त्यांच्या राजीनाम्याने फायदा होईल की नुकसान होईल हे पाहू नये. कॅबिनेट मंत्र्यांचा हा जिल्हा आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर दबाप आहे. पोलिसांच्या तक्रारीही येत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी काही वेळासाठी अलिप्त राहिलं पाहिजे. सरकार त्यांचचं आहे. अजितदादांनी एवढी मोठी पाठराखण केली आहे. एक दोन महिन्याचा प्रश्न आहे. एकदा का तपास पूर्ण झाला तर पुन्हा शपथविधी घ्या. कुणी अडवलंय? असा सवाल त्यांनी केला.

क्लीनचिट देणं न देणं हा त्यांचा…

धनंजय मुंडे आणि महंत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे त्या दोघांनाच माहिती आहे. मात्र महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना निर्दोष सिद्ध करून एक प्रकारे क्लीनचीट दिलेी आहे. कुणाला क्लीनचिट द्यायची आणि नाही हा महंतांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तपास यंत्रणा वाल्मिक कराचे आका, हप्तेखोर याचा तपास करतीलच, हा मला ठाम विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या.
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल.
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?.
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन.
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी.
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार.
शनिशिंगणापूरच्या शनिला आजपासून ब्रँडेड तेल, देवस्थानाचा मोठा निर्णय का
शनिशिंगणापूरच्या शनिला आजपासून ब्रँडेड तेल, देवस्थानाचा मोठा निर्णय का.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरने दिली धमकी?
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरने दिली धमकी?.
'ना जबरदस्ती ना धक्काबुक्की... दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध'
'ना जबरदस्ती ना धक्काबुक्की... दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध'.