सात दिवसात जप्त केलेली वाहनं घेऊन जा, अन्यथा लिलाव करु, पोलिसांचा वाहनमालकांना इशारा
नाशिक जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांच्या मालकांना पोलीस ठाण्यात येऊन सात दिवसाच्या आत वाहन नेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी आवाहन केले आहे.
नाशिक: जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांच्या मालकांना पोलीस ठाण्यात येऊन सात दिवसाच्या आत वाहन नेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी आवाहन केले आहे. विहित मुदतीत वाहनं घेऊन जावीत, अन्यथा लिलाव केला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Nashik Ambad Police appeal to vehicle owners to take back seized vehicles by Police within seven days)
सात दिवसात वाहनं घेऊन जा
अंबड पोलीस ठाण्यात सन 1999 ते सन 2019 पर्यंत च्या दरम्यान 137 मोटारसायकल, 39 तीन चाकी व चार चाकी वाहने अद्याप पर्यंत पडून आहेत.अद्यापपर्यंत या गाड्यांसाठी त्यांच्या मालकांनी मालकीहक्क दाखवण्याकरिता कोणतेही कागदपत्र सादर केलेले नाही.सदर वाहने हे संबंधित मालकांनी हक्काबाबतच्या कागदपत्रासह अंबड पोलिस ठाण्यात येऊन आपली वाहने सात दिवसांच्या आत घेऊन जावे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
न्यायालयाच्या परवानगीनं लिलाव होणार
वाहनधारक त्यांची वाहनं घेऊन गेले नाहीत तर सदरच्या वाहनांचा न्यायालयाची रीतसर परवानगी घेऊन वाहनांचा लिलाव करण्यात येईल. लिलाव केल्यानंतर वाहनांच्या मालकांची कोणत्याही आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही तरी संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह अंबड पोलीस ठाण्यात संपर्क साधून आपली वाहने घेऊन जावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. वाहनांच्या मालकाचे नाव, गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर ,चेसी नंबर याची यादी पोलीस ठाण्यामध्ये लावलेली असल्याचे देखील पोलिसांतर्फे कळविले आहे.
कोरोनामुळे नाशिक स्मार्ट सिटीला प्रकल्पाला मुदतवाढ
सीताराम कुंटे यांनी नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाला मुदतवाढ 2 वर्ष मिळणार असल्याची माहिती यावेळी दिली. कोविड मुळे हा कालावधी वाढवून देण्यात येत आहे. शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासन, पदाधिकारी यासोबत समन्वय आवश्यक आहे, असं सीताराम कुंटे म्हणाले. ग्रीन फिल्ड प्रस्ताव नगरविकास विभागाकडे, मात्र हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. ABD प्रोजेक्ट मध्ये शहरात अतिरिक्त रस्ते निर्मिती केली जाते. कोरोना मुळं स्मार्ट सिटी कामातील गती कमी झाली. या प्रकल्पात आता विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी समन्वयक असतील.
इतर बातम्या:
रासायनिक खतांचा वापर न करता कांदा पिकवला, बाजारपेठेत मिळाला विक्रमी भाव
कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, लासलगांव बाजारसमितीत 1315 कोटींची उलाढाल
(Nashik Ambad Police appeal to vehicle owners to take back seized vehicles by Police within seven days)