Nashik Lockdown update : नाशिकची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल, नियम न पाळणारी दुकानं 6 महिन्यांसाठी बंद

Nashik corona and Lockdown नाशिक सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनत आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यातही नाशिक चर्चेत होतं. कारण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता.

Nashik Lockdown update : नाशिकची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल, नियम न पाळणारी दुकानं 6 महिन्यांसाठी बंद
Nashik
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 12:41 PM

नाशिक : नाशिकची वाटचाल टाळेबंदीच्या (Nashik corona and Lockdown update) दिशेने सुरु आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailash Jadhav) यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. डॉक्टरचं कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याने येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती आहे. बेड उपलब्ध करुन देणे अवघड नाही, मात्र आरोग्य कर्मचारीच कोरोनाच्या विळख्यात सापडले तर उपचार कोण करणार त्यामुळे नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळावे, असं आयुक्तांनी दरडावलं आहे. नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर शेवटचा पर्याय म्हणून टाळेबंदी करावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. काल दिवसभरात 3 हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यात झाल्याने आज तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर सतीश कुलकर्णी,आयुक्त कैलास जाधव यांच्यासह इतर नेते बैठकीला उपस्थित होते. (Nashik corona and Lockdown update 3338 new covid19 cases in last 24 hours commissioner Kailash Jadhav warns lockdown)

नाशिक सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनत आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यातही नाशिक चर्चेत होतं. कारण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. त्यानंतर हळूहळू नाशिक शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग अधिक झपाट्याने वाढू लागला. मात्र प्रशासनाने केलेलं उत्तम नियोजन कोरोनाला काही प्रमाणात का होईना अटकाव करू शकलं होतं. परंतु आताची परिस्थिती नाशिक जिल्ह्यासाठी भयावह होत चालली आहे. दिवसागणिक जिल्ह्यात अडीच ते तीन हजाराच्या घरात रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत पडलं आहे.

एकीकडे प्रशासन काटेकोर अंमलबजावणीच्या तयारीत असताना, नागरिकांना मात्र त्याचं गांभीर्य नसल्याचं दिसत आहे. कारण अनेकजण सर्रासपणे बाजारात गर्दी करतायत,मास्क वापरत नाहीत,विनाकारण बाहेर फिरत आहेत.

गेल्या पाच दिवसातील नाशिकमधील कोरोनाची स्थिती

20 मार्च – 2383 रुग्ण पॉझिटिव्ह : 8 मृत्यू

21 मार्च – 2360 रुग्ण पॉझिटिव्ह : 10 मृत्यू

22 मार्च – 2779 रुग्ण पॉझिटिव्ह : 12 मृत्यू

23 मार्च – 2644 रुग्ण पॉझिटिव्ह : 15 मृत्यू

24 मार्च – 3338 रुग्ण पोझिटिव्ह : 15 मृत्यू

गेल्या 24 तासातील 3338 हा रुग्णसंख्येचा आकडा उच्चांक आहे.

आता प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांवर एक नजर टाकूयात

– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं,बाजारपेठा सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू राहतील..

– भाजी मार्केट 50 टक्के क्षमतेने सुरू राहील

– शाळा,कॉलेज,खाजगी क्लासेस सर्व बंद आहेत

– सर्वजनिक कार्यक्रम तसेच लग्न सोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे

– दुकान,आस्थापना,हॉटेल नियम पाळणार नाहीत ते 1 महिना ते 6 महिन्या बंद केले जाणार आहेत.

– दर शनिवार,रविवार शहरात अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. बंद कोरोना सेंटरही सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या आहेत. तसेच जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेत.

संबंधित बातम्या   

VIDEO | वीज कनेक्शन दोन दिवस खंडित, नाशकात संतप्त शेतकऱ्यांनी आमदारालाच कोंडलं    

Nashik | नाशकातील बंद जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु    

Nashik | नाशिक शहरात शनिवार-रविवार संपूर्ण लॉकडाऊन, कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाचा निर्णय

(Nashik corona and Lockdown update 3338 new covid19 cases in last 24 hours commissioner Kailash Jadhav warns lockdown)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.