नाशिकमध्ये कोरोना मृत्यूच्या आकडेवारीचा सावळागोंधळ, 24 तासात तब्बल 510 मृत्यूची पोर्टलवर नोंद

नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहे. मात्र नाशिकमध्ये कोरोना मृत्यूच्या आकडेवारीचा सावळागोंधळ अद्याप सुरुच आहे. (Nashik Corona death statistics Confusion)

नाशिकमध्ये कोरोना मृत्यूच्या आकडेवारीचा सावळागोंधळ, 24 तासात तब्बल 510 मृत्यूची पोर्टलवर नोंद
Covid 19 bodies
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 2:24 PM

नाशिक : नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहे. मात्र नाशिकमध्ये कोरोना मृत्यूच्या आकडेवारीचा सावळागोंधळ अद्याप सुरुच आहे. नाशिकमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 510 मृत्यूची नोंद पोर्टलवर केली गेली आहे. मात्र एकाच दिवसात अचानक एवढ्या मृत्यूची नोंद कशी करण्यात आली? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. (Nashik Corona death statistics Confusion 510 deaths recorded on portal in last 24 hours)

गेल्या 24 तासात 510 मृत्यूची नोंद

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीचा दरही कमी झाला असून पॉझिटिव्हीटी रेटही कमी होत आहे. मात्र गेल्या 24 तासात नाशिकमध्ये तब्बल 510 मृत्यूची नोंद पोर्टलवर करण्यात आली आहे. यात नाशिक महापालिका 122, मालेगाव महापालिका 4 तर नाशिक ग्रामीणच्या 384 जणांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त गेल्या 48 तासात जिल्ह्यात 5 जण कोरोनामुळे दगावले आहेत. त्यामुळे धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 6 हजार 430 नागरिकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव

याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधल्या काळात दुसऱ्या लाटेत सर्व रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड तणाव होता. त्यासोबतच इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या अडचणी, प्रयोगशाळेतून रुग्णाचा ICMR ID वेळेत प्राप्त न होणे, डेटा एंट्री करणारे, अपुरे मनुष्यबळ यामुळे काही रुग्णालयांकडून पोर्टलवर ही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे यात विलंब झाला.

मृत्यूची संख्या अपडेट करण्याचे काम सुरु

मात्र यापुढे नियमितपणे पोर्टलवर माहिती अपडेट करावी, अशी सूचना सर्व रुग्णालयांना देण्यात आली आहे. दरम्यान पुढील काही दिवस पोर्टलवर कोरोना मृत्यूची संख्या अपडेट करण्याचे काम असेच सुरु असेल, असेही त्यांनी सांगितले.

नाशिकमधील कोरोना अपडेट

नाशिकमधील कोरोना लसीकरणाची आकडेवारी

(Nashik Corona death statistics Confusion 510 deaths recorded on portal in last 24 hours)

संबंधित बातम्या :

पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ आमच्याशी ; तुषार भोसलेंचं अजितदादांना आव्हान

देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट, नाशिकमधील बहुप्रतीक्षीत बससेवेला मुहूर्त मिळाला

बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला स्वत:चं नाव नाकारलं असतं; छगन भुजबळांची वादाला फोडणी?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.