विकेंडला पर्यटनाला जाण्याचा प्लॅन करताय, विनाकारण घराबाहेर पडल्यास हमखास कारवाई , नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर

विकेंडला विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकावर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस ॲलर्ट झाले आहेत. नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवत गर्दी करत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये निदर्शनास आलं होतं Nashik Corona Update

विकेंडला पर्यटनाला जाण्याचा प्लॅन करताय, विनाकारण घराबाहेर पडल्यास हमखास कारवाई , नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर
नाशिक पोलीस
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 11:25 AM

नाशिक: महाराष्ट्रसह नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा  (Nashik Corona Update)धोका अद्यापही कायम आहे. कोरोना विषाणू (Corona Virus) आणि डेल्टा प्लस वेरियंटचं (Delta Plus) वाढतं संकट लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. ब्रेक द चैनचे निर्बंध शिथील केल्यानंतर अनेक नागरिक विकेंडला घराबाहेर पडत पर्यटन स्थळांवर गर्दी करत असल्याचं समोर आलं होतं. नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर गर्दी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. (Nashik Corona Update Nashik Police warn citizens to not make crowd in district without any essential reason)

नाशिक पोलीस अ‌ॅक्शन मोडवर

विकेंडला विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकावर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस अ‌ॅलर्ट झाले आहेत. नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवत गर्दी करत असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये निदर्शनास आलं होतं. हे बघता नाशिक पोलिसांनी कडक इशारा दिलाय. अत्यावश्यक काम वगळता विनाकारण गर्दी कराल तर थेट कारवाईला सामोरे जावं लागेल, असं नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.

नाशिकचं प्रशासन तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळं हाय अ‌ॅलर्टवर

नाशिक जिल्ह्यात सद्य स्थितीत जरी कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी मात्र पुढील काळात तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन हाय अलर्टवर आहे.शहरासह ग्रामीण भागात ही कोरोनाने थैमान घातलेल असल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रत्यक गावागावात विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.मात्र, महिना उलटूनही एक ही गावातून विलगीकरण कक्षाचा प्रस्ताव आला नसल्याने आरोग्य विभागाच्या सूचनेला पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या आहेत. कोरोनाचे नवनवीन धोके सद्या वाढत आहेत.आणि त्यामुळे पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नये याकरिता प्रशासन काळजी घेतंय,मात्र ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील सतर्कता बाळगायला हवीय.

राज्यात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध

1. अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. 2. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. 3. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. 4. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 5. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. 6. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. 7. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. 8. मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. 9. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. 10. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. 11. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल. 12. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

संबंधित बातम्या:

नाशिकमध्ये पावसाची दडी, शेती कामांना ब्रेक, जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट

नाशिकची बहुचर्चित बससेवा सुरु होणार, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटनाचा भाजपचा प्रयत्न

(Nashik Corona Update Nashik Police warn citizens to not make crowd in district without any essential reason)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.