Nashik Crime : नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली 15 लाख हडपले; अभियंत्यासह महिला सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा

नाशिकमध्ये (Nashik) विकासाच्या नावाखाली तब्बल पंधरा लाखांचा निधी (Funding) हडपल्याप्रकरणी पाणीपुरवठा शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्यासह ताहाराबादच्या महिला सरपंच आणि ग्रामसेवकावर जायखेडा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime : नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली 15 लाख हडपले; अभियंत्यासह महिला सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा
पैशासाठी आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकणाऱ्या प्रेमी युगुलाला तुरुंगवासाची शिक्षाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 3:07 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) विकासाच्या नावाखाली तब्बल पंधरा लाखांचा निधी (Funding) हडपल्याप्रकरणी पाणीपुरवठा शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्यासह ताहाराबादच्या महिला सरपंच आणि ग्रामसेवकावर जायखेडा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. ताहाराबाद ग्रामपंचायतीला चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगातून निधी मिळाला होता. मात्र, यातून कामे न करता खोटी बिले सादर करून कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी सटाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. त्यात खोटी बिले खरी भासवण्याचा प्रयत्न करून सुमारे 14 लाख 63 हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची मुळापासून चौकशी करावी. यात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

घरकुलावर डल्ला मारायचा इरादा

देवळा तालुक्यातल्या गिरणारे येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवून लाभ घेतलेल्या धनदांडग्यांना घरकुल मंजूर केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा गिरणारेतल्या नागरिकांनी दिला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षातला हा प्रकार आहे. घरकुल योजनेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार देवरे यांनी सर्वेक्षण केले. त्यासाठी 138 लाभार्थ्यांची निवड केली. मात्र, यात साऱ्या धनदांडग्या लोकांची नावे निवडल्याचे समोर आले आहे.

नव्याने सर्वेक्षण करावे

दरम्यान, घरकुल योजनेच्या यादीला गिरणारे येथील नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. गरजू लाभर्थ्यांना वगळून ज्यांनी पूर्वी घरकुल मिळवले अशांची त्यात नावे आहेत. विशेष म्हणजे यातील लाभार्थी आर्थिक दुर्बल घटाकातील नाहीत. त्यामुळे ही यादी रद्द करावी. पुन्हा एकदा लाभार्थ्यांची निवड करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. अन्यथा पंचायत समितीसमोर उपोषण सुरू करू, असा इशारा दिला आहे. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.