नाशिकच्या डॉक्टरची सिन्नरच्या लॉजमध्ये आत्महत्या; सुसाइट नोट लिहून सांगितली आपबिती
घटनास्थळी दारूची बाटली आढळली आहे. शिवाय काही गोळ्या त्यांनी सेवन केल्याचे समोर आले आहे. या गोळ्याची पाकिटेही खोलीत सापडलीयत. त्यांचा मृतदेह सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
नाशिकः नाशिक (Nashik) येथील एका डॉक्टरने (Doctor) सिन्नरमधील लॉजमध्ये आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. डॉ. स्वप्नील दीपक पाटील (वय 37) असे मृताचे नाव असून, त्यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवलीय. डॉ. स्वप्नील यांचे एमबीबीएस झाले आहे. ते नाशिकमधील उच्चभ्रू अशा गंगापूररोड भागात रहायचे. ते शनिवारी सिन्नरला गेले होते. बसस्थानकाजवळील हॉटेल प्रेसिडेंट लॉजमध्ये ते उतरले. दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी खोली बंद केली. त्यानंतर संध्याकाळी रूममधून बाहेर पडले. हे सारे हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी एकदाही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून डोकावून खोलीत पाहिले. तेव्हा डॉ. पाटील बेडवर पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. तोपर्यंत डॉ. स्वप्नील यांचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळी गोळ्याची पाकिटे…
घटनास्थळी दारूची बाटली आढळली आहे. शिवाय काही गोळ्या त्यांनी सेवन केल्याचे समोर आले आहे. या गोळ्याची पाकिटेही खोलीत सापडलीयत. त्यांचा मृतदेह सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांचा व्हिसेरा डॉक्टरांनी राखून ठेवलाय. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुसाइड नोटमध्ये काय?
डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाइट नोट लिहून ठेवलीय. त्यात म्हटले आहे की, मी लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे आत्महत्या करत असून, याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये. माझ्यावर आत्महत्येसाठी कुठलाही दबाव नाही. पत्नी, आई-वडील, भावाने आतापर्यंत खूप साथ दिली. मात्र, मी माझे कर्तव्य पार पाडू शकलो नाही. लिव्हरच्या आजारामुळे मला नित्याची कामेही करता येत नाहीत. नोकरी नाही. घरी बसलो तर लोक नावे ठेवतात. कर्ज झाले आहे. या साऱ्याला कंटाळून मी माझे जीवन संपवत आहे.