शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाहून कुणी दिल्या घोषणा?; मतदानाच्या दिवशी नाशकात घोषणाबाजी

Declaration Against Shivsena Shinde Group Leader Hemant Godase Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी नाशकात घोषणाबाजी झाली. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाहून कुणी घोषणा दिल्या? नाशिकमध्ये नेमकं काय घडलं आहे? वाचा सविस्तर...

शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाहून कुणी दिल्या घोषणा?; मतदानाच्या दिवशी नाशकात घोषणाबाजी
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 7:16 PM

मुंबईतील सहा मतदारसंघांसह कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिकमधलं मतदान संपलं. कालावधी संपल्यानंतर मतदान केंद्राचं गेट बंद करण्यात आलं. नाशकात मतदानाच्या दिवशी विविध घडामोडी घडल्या.महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी सती आसरा मातेच्या दर्शनाने केला मतदानाचा समारोप केला. सकाळी सुद्धा काळाराम मंदिरात दर्शन घेवून हेमंत गोडसे यांनी दिवसाची सुरुवात केली होती. दिवसभरात नागरिकांच्या भेटीगाठी घेत जाणून कल घेतला. शेवटी देवीच्या दर्शनाने हेमंत गोडसे यांनी केला मतदानाच्या दिवसाचा समारोप केला.

गोडसेंना पाहून कुणी दिल्या घोषणा?

भद्रकाली रोड परिसरात हेमंत गोडसेंना पाहून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. हेमंत गोडसे मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आले असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना बघून 50 खोके आणि एकदम ओके अशा घोषणा दिल्या गेल्या. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर म्हणून महायुद्धाच्या कार्यकर्त्यांकडूनही जय श्रीरामचां जय घोष करण्यात आला. ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली गेली.

आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची

नाशिकमध्ये आजी-माजी आमदार एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमधील भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यात राडा झाला. फरांदे आणि गीते यांच्या वादाचा आणखी एक व्हीडिओ समोर आला आहे. आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यातील वादानंतर नाशिकच्या मध्य विधानसभा मतदारसंघात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय. नाशिक पोलिसांकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या 31 उमेदवारांचे भवितव्य आता मतपेट्यांमध्ये बंद झालं आहे. चार जूनला या मतभेटीतून उमेदवारांचे भवितव्य समजणार आहे. मात्र आज दिवसभरात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून मतपेटाच्या आहेत. त्या पॅक केल्या जात आहेत. सिलिंग करण्याचे काम कर्मचारी करत आहेत. मतदान यंत्र पेट्यांमध्ये पॅकिंग सिलिंग करून स्ट्रॉंग रूमकडे निल्या जात आहेत.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.