कोरोनामुक्तीसाठी कंबर कसली, नाशिक जिल्ह्यात 100 टक्के लसीकरणासाठी ‘कवच-कुंडल’ मोहीम
जिल्ह्यातील तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के होण्याच्या हेतुने कवच कुंटड मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये आजपासून (8ऑक्टोबर) जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ‘कवच-कुंडल’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
नाशिक : जिल्ह्यातील तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के होण्याच्या हेतुने कवच कुंटड मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये आजपासून (8ऑक्टोबर) जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ‘कवच-कुंडल’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नागरीकांनी सहभागी होऊन लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोहीम राबवणार
यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार, नाशिक जिल्ह्यामध्ये 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव महानगर पालिकेसह सर्व शहरी, ग्रामीण भागातील गाव, पाडे अंतर्गत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना पहिला डोस व दुसरा डोस देऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.
100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट
तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, यांच्या सहकार्याने वरील कालावधीमध्ये सर्व गावांमध्ये तीन दिवस आधी पूर्व सूचना देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या लसीकरणाचे नियोजन सोयीनुसार करता येईल. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना पहिला व दुसरी डोस देऊन त्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण व्हावे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत सूक्ष्म नियोजन केले असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.
लाऊडस्पीकरवरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार
या मोहिमेत सर्व गावांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये भिंतीवर म्हणी लिहून तसेच प्रत्येक गावात विद्यार्थ्यांमार्फत कोरोना नियमावलीचे पालन करून रॅलीचे आयोजन करण्यात येईल. काही ठिकाणी लाऊडस्पीकरवरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्याला राज्यस्तरावरून चांगल्या प्रकारे लस पुरवठा होत असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, गावातील सर्व लोकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. तसेच लसीकरणाचे नियोजन गावातील लोकांच्या कामाच्या सोयीने व्हावे, यासा
इतर बातम्या :
मोहन डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन! पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारीची घोषणा
शाहरुख खानला मोठा धक्का, आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आता जामीन मिळणार का?
(nashik district government will conduct Kavach Kundal campaign for 100 percent corona vaccination information given by chhagan bhujbal)