AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधील ई-पासपोर्ट छपाईला ग्रीन सिग्नल; यंत्र खरेदीसाठी जागतिक टेंडर निघणार!

केंद्र सरकारने पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता अत्याधुनिक चिपच्या मदतीने ई-पासपोर्ट तयार केला जाणार आहे. त्यामुळे पासपोर्टमधील कुठलिही माहिती लिक होणार नाही. हेच पासपोर्ट नाशिकमध्ये छापले जाणार आहेत.

नाशिकमधील ई-पासपोर्ट छपाईला ग्रीन सिग्नल; यंत्र खरेदीसाठी जागतिक टेंडर निघणार!
नाशिकमध्ये ई-पासपोर्टची छपाई केली जाणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 11:35 AM

नाशिकः देशभरातील सर्व ई-पासपोर्ट (E-Passport) नाशिकच्या (Nashik) इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये (India Security Press) छापण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण ई-पासपोर्टच्या छपाईसाठी आवश्यक असलेल्या यंत्र खरेदीसाठी जागतिक टेंडर काढायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तसे संकेत नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाला देण्यात आले आहेत. प्रेसमध्ये आता नवी मशिनरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मुद्रांक, धनादेश, मद्याचे सील, पोस्ट तिकिटांची छपाईसह इतर कामांचा मार्क मोकळा झाला आहे. पासपोर्ट छपाईसाठी वेगळा कागद लागतो. तसेच इतर अनेक तुंबलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्तिक डांगे यांनी परराष्ट्रा मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेतली होती. त्यानंतर हा विषय मार्गी लागला आहे. आता लवकरच हे टेंडर काढण्यात येणार असल्याचे समजते.

कधी मिळाली मंजुरी?

देशभरातील सर्व ई-पासपोर्ट नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये छापले जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात केली. आतापर्यंत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसने चाचणीकरिता 20 हजार ई-पासपोर्ट बनवून दिले आहेत. यापुढे दिवसाला 50 हजार ई-पासपोर्ट बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे देशभरातील जवळपास 25 ते 30 कोटी पासपोर्ट बनवण्याचे काम इंडिया सिक्युरिटी प्रेसला मिळणार आहे. मार्च महिन्यात हे काम सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, यंत्र खरेदीमुळे हे काम रखडले होते.

ई-पासपोर्टचे महत्त्व काय?

केंद्र सरकारने पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता अत्याधुनिक चिपच्या मदतीने ई-पासपोर्ट तयार केला जाणार आहे. त्यामुळे पासपोर्टमधील कुठलिही माहिती लिक होणार नाही. त्यावरील डिजिटल स्वाक्षरी सुद्धा सुरक्षित राहील. या पासपोर्टशी कोणी छेडछाड केली, तर त्याची माहिती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे या पासपोर्ट गैरवापर टळणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोन हजारांच्या नोटा चलनात आल्यानंतर त्याची छपाईही नाशिकमध्येच झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एक महत्त्वाच्या कामाची धुरा नाशिकवर येऊन पडली आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च.
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.