Nashik| अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 10 लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार; कसा घ्यावा लाभ, वाचा सविस्तर…!

नाशिक जिल्ह्यासाठी एक जिल्हा उत्पादन या घटकांमध्ये कांदा या पिकाची निवड करण्यात आली आहे. यात सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पांना अनुदान देण्यात येणार आहे.

Nashik| अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 10 लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार; कसा घ्यावा लाभ, वाचा सविस्तर...!
नाशिक जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 7:05 AM

नाशिकः प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गतच्या (PMFME) कर्जासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन केले आहे. या योजनेअतंर्गत लाभार्थ्याला चक्क 10 लाखांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्प, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट यांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

काय आहे योजना?

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत असंघटीत अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांच्या स्पर्धेत वाढ करण्यासाठी तसेच शेतकरी उत्पादक संस्था स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्थाच्या उत्पादनासाठी सर्वकष मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 जानेवारी ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत ‘कृषी प्रक्रिया उद्योगास कर्ज मंजुरी पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

यंदा कांदा पिकाची निवड

केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे. नाशिक जिल्ह्यासाठी एक जिल्हा उत्पादन या घटकांमध्ये कांदा या पिकाची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्के पर्यंत व जास्तीत जास्त रूपये 10 लाख या मर्यादेपर्यंत प्रती प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यात सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्प, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट यांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडीत प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

येथे मिळेल माहिती अन् अर्ज

योजनेबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन अर्ज सादर करण्याविषयी माहिती कृषी विभागाच्या http://pmfme.mofpl.gov,in व एम.आय.एस.ॲप्लिकेशन http://pmfme.mofpi.gov.in/mis/#login या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यापासून ते बँक कर्ज मंजुरी या प्रक्रियेस गतिमानता आणण्यासाठी इच्छुक व पात्र लभार्थ्यांनी वैयक्तिक सूक्ष्म प्रक्रिया उद्योग, इन्क्युबेशन सेंट, पायभूत सुविधा, ब्रँडींग व विपणन, क्षमता बांधणी व संशोधन यासाठी प्रशिक्षण संस्था यासाठी विहित पद्धतीने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Nashik| नाशिकमधल्या मखमलाबाद कालव्यात तीन मुले बुडाली!

ST Strike|विलीनीकरण नसेल, तर मरण द्या; नाशिकमधील 269 एसटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

चर्चा तर होणारचः नाशिक महापालिकेची प्रभागरचना फुटली, इच्छुकांमध्ये भीतीचे काहूर; आयुक्तांना पत्र, कोर्टात जायचा इशारा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.