सर्वात मोठी बातमी, आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांची नाशिकध्ये गुप्त भेट?

Dada Bhuse meets Aaditya Thackeray in Nashik | नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ सत्तेत सहभागी झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. असं असताना आता दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्या गुप्त भेटीची बातमी समोर आलीय.

सर्वात मोठी बातमी, आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांची नाशिकध्ये गुप्त भेट?
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 1:17 AM

नाशिक | 19 ऑगस्ट 2023 : नाशिकमधून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यात नाशिकमध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दादा भुसे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे कृषीमंत्री होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदे सरकार आल्यानंतर ते पुन्हा मंत्री बनले. त्यांना बंदरे आणि खाणकाम विभागाचं मंत्रिपद मिळालं होतं.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते असेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट सरकारमध्ये सामील झाला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी मंत्र्यांच्या खात्यांमध्ये आदलाबदल करण्यात आली. यावेळी दादा भुसे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाचं मंत्रिपद देण्यात आलं. त्यानंतर आता नाशिकमधून वेगळीच बातमी समोर येताना दिसत आहे.

आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्यात गुप्त भेटीची चर्चा

दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खाजगी रिसॉर्टमध्ये ही भेट झालीय. आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांची भेट झालेलं रिसॉर्ट बेजे गावातील असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीच्या बातमीवर दादा भुसे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आता आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आदित्य ठाकरे स्वतः गाडी चालवत नाशिकला आले

मंत्री दादा भुसे कुठलाही प्रशासकीय दौरा नसतांना अचानक मालेगाववरून नाशिकला आले होते. तर आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा खाजगी असल्याची सुरुवातीला माहिती होती. आदित्य ठाकरे स्वतः गाडी चालवत नाशिकला आले होते . विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्या भेटीची मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्यात आली. त्यामुळे आता या भेटीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

दादा भुसे यांच्याकडून वृत्ताचं खंडन

दरम्यान, दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. मी कौटुंबिक कारणासाठी नाशिकमध्ये आल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. दादा भुसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला फोनवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संबंधित वृत्ताचं खंडन केलं. पण सूत्रांकडून, दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

“मी या क्षणाला सुद्धा तुम्हाला माझं लोकेशन पाठवलं आहे. नाशिकमध्यल्या हॉटेलमध्ये आम्ही आमच्या नातीचा पहिला वाढदिवस साजरा करतोय. मालेगावला लहान मुलांच्या उपस्थितीत नातीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आम्हाला करायचा होता. पण पाऊस नसल्यामुळे पीकं करपायला लागली आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंबापुरता वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं”, असं दादा भुसे यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.