Nashik-Pune High Speed Railway : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमुळे 5 ते 6 तासाचा प्रवास किती वेळेत होईल?

Nashik-Pune High Speed Railway : महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा आहे. नाशिक आणि पुणे ही दोन्ही महाराष्ट्रातील समृद्ध, प्रगत शहर आहेत. पण अजूनही रेल्वे मार्गान ही शहर जोडली गेलेली नाहीत. नाशिक-पुणे दोन्ही शहर हायस्पीड रेल्वेने जोडली गेल्यास दळणवळणामध्ये मोठा फरक पडेल.

Nashik-Pune High Speed Railway : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमुळे 5 ते 6 तासाचा प्रवास किती वेळेत होईल?
Nashik Pune High Speed Railway project
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 4:00 PM

सध्या देशात नरेंद्र मोदी सरकारचा 3.0 कार्यकाळ सुरु आहे. पहिल्या दोन टर्ममध्ये देशात पायाभूत सोयी-सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. यात रस्ते, ब्रिज उभारणी तसेच हवाई आणि रेल्वे मार्ग विस्तार याचा समावेश होता. महाराष्ट्रात रेल्वेचे काही प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत. यात नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प एक आहे. आता नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी पालकमंत्री दादा भुसे मैदानात उतरले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून या रेल्वे प्रकल्पाला लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी, अशी मागणी केली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने हालचाल केली. राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे दादा भुसे शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात अंतर्गत स्पर्धा आहेत. त्यातूनच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. नाशिक आणि पुणे ही दोन्ही महाराष्ट्रातील समृद्ध, प्रगत शहर आहेत. पण अजूनही रेल्वे मार्गान ही शहर जोडली गेलेली नाहीत.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे किती किलोमीटरचा मार्ग?

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पात 235 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. नाशिक-पुणे दरम्यान 20 रेल्वे स्टेशन असतील. सध्या नाशिक-पुणे रस्त्याने जाण्यासाठी 5 ते 6 लागतात. मात्र मात्र या हायस्पीड रेल्वेमुळे हाच प्रवास फक्त 1 तास 45 मिनिट वर येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे. अद्याप प्रकल्पाला मंजुरी नाही. त्यामुळे प्रकल्पाला गती मिळत नाहीय. या आधी देखील स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मुंबईत बैठक घेतली होती. पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्रानंतर पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.