नाशिकच्या इगतपुरीला पाणीपुरवठा होणारं भावली धरण भरण्याच्या मार्गावर, नियोजनाअभावी शहरात पाण्याची चिंता

गतवर्षीपेक्षा पावसाचा आलेख उंचावला असला तरी नियोजनाच्या अभावामुळे पुन्हा भर पावसाळ्यात महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरात पाणीचिंता सुरू झाली आहे.

नाशिकच्या इगतपुरीला पाणीपुरवठा होणारं भावली धरण भरण्याच्या मार्गावर, नियोजनाअभावी शहरात पाण्याची चिंता
भावली धरण
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 4:31 PM

नाशिक: जून महिन्यापासून हजेरी लावलेल्या पावसाने यंदा आपला मुक्काम चांगलाच लांबविला. वारंवार दिला जाणारा अतिवृष्टीचा इशारा आणि अविश्रांत कोसळणाऱ्या मुसळधारेने इगतपुरीकर हैराण झाले आहेत. मात्र असे असले तरी गतवर्षीपेक्षा पावसाचा आलेख उंचावला असला तरी नियोजनाच्या अभावामुळे पुन्हा भर पावसाळ्यात महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरात पाणीचिंता सुरू झाली आहे. पाणीकपात करण्यासाठी तत्परता दाखविणारे प्रशासन पाण्याच्या नियोजनाबाबत मात्र तत्पर नसल्याची खंतही यावेळी नागरिकांकडून व्यक्त केली जाात आहे. भावली धरण सततच्या पावसामुळं भरण्याच्या मार्गावर असून पाणीकपात कधी रद्द होणार याकडे इगतपुरीकरांचं लक्ष लागंल आहे.

स्थानिकांवर पाण्यासाठी संघर्षाची वेळ

2017 ला 2 वर्षात भावली धरणाचे पाणी इगतपुरी शहराला 24 तास उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आलं. मात्र, प्रत्यक्षात 3 वर्षाहून जास्त कालावधी उलटून गेला तरीही अद्याप शहरात पाईप लाईनचे काम झालेले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच डिसेंबर ते मार्च आठवड्यात तीन दिवस पाणी व नंतर एप्रिल ते जुलैपर्यंत आठवड्यातून दोन दिवस पाणी शहरातील नागरिकांना दिले जात आहे. त्यातही पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. दिवसाला 45 मिनिटेही पाणी पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील स्थानिकांना पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.तर सदर खणलेले खड्डे लवकर मुजवण्यात येणार असून लवकरच इगतपुरी शहराची पाणी कपात ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद होणार असल्याचे प्रशासनानं सांगितलंय. भावली पाणी योजना डिसेंम्बर अखेर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यानी सांगितले. गेल्या 24 तासात तालुक्यात 55 मिलीमीमीटर पावसाची नोंद झाली असून आता पर्यंत 1623 मिली पाऊस पडला आहे.

तीन दिवसांपासून संततधार

महाराष्ट्र राज्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पावसाने गेला एक महिना दडी मारली होती. त्यामुळे येथील नागरिक व बळीराजा चिंता ग्रस्त झाला होता. परंतु गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणाऱ्या भावली धरणातील पाणी साठा वाढला आहे. दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या दीड हजार दस लक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे तसेच दरम्याण दारणा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेले भावली धरणातील पाणीसाठा दारणा धरणात सोडून पुढे जायकवाडीला सोडण्यात येते. संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या भावली धरणावर आहे भावली धरण आज सकाळी 95 टक्के भरले असून असाच पाऊस सुरू राहीला तर येत्या 1 ते 2 दिवसात हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहील.

इतर बातम्या

VIDEO | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, सलग दुसऱ्या दिवशी 41 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

VIDEO: कोण म्हणालं माझे वडील गायब आहे, तर कोण म्हणालं माझी आई… तळीये दुर्घटनाग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांपुढे आक्रोश

(Nashik Igatpuri Dhawali dam may full with water but Igatpuri citizens not get water sufficient)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.