इगतपुरीतील रेव्ह पार्टी प्रकरण, 5 आरोपींना जामीन 20 जणांचा जामीन अर्ज फेटाळला, हीना पांचाळचं काय झालं?

नाशिकच्या इगतपुरी (Igatpuri) येथील रेव्ह पार्टीतील 25 संशयित आरोपींपैकी 5 जणांना जामीन मिळाला आहे. तर, 20 जणांचा जामीन अर्ज इगतपुरी न्यायालयाने पुन्हा फेटाळत 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

इगतपुरीतील रेव्ह पार्टी प्रकरण, 5 आरोपींना जामीन  20 जणांचा जामीन अर्ज फेटाळला, हीना पांचाळचं काय झालं?
इगतपुरीत रेव्ह पार्टी झालेल्या बंगल्यांवर कारवाई
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 7:21 PM

नाशिक: नाशिकच्या इगतपुरी (Igatpuri) येथील रेव्ह पार्टीतील 25 संशयित आरोपींपैकी 5 जणांना जामीन मिळाला आहे. तर, 20 जणांचा जामीन अर्ज इगतपुरी न्यायालयाने पुन्हा फेटाळत 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 20 संशयित आरोपींना एका दिवसासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आलं आहे. रेव्ह पार्टीत वापरलेले बंगलेही पोलिसांनी सील केले. (Nashik Igatpuri High Profile Rave Party court approved bail to five accused related to case)

20 आरोपींना न्यायालयीन कोठडी

रेव्ह पार्टीतील 25 संशयित आरोपींपैकी इगतपुरी न्यायालयाने 5 जणांचा जामीन मंजूर करत उर्वरीत 20 आरोपींचा जामीन न्यायालयाने आज पुन्हा फेटाळत 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच रेव्ह पार्टीत वापरलेले 2 बंगलेही पोलिसांनी सील केले आहेत. इगतपुरीत झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस आणखीच आक्रमक झाले आहेत. रेव्ह पार्टीसाठी वापरले गेलेले इगतपुरीतील 2 बंगलेही पोलिसांनी सील केले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरीतील स्काय ताज व स्काय लगुन या अलिशान बंगल्यात चाललेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकून रेव्ह पार्टी उधळून लावली होती.

हीना पांचाळचं काय झालं

रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेला ‘बिग बॉस मराठी’ फेम मॉडेल अभिनेत्री हीना पांचाळ सह 25 जणांना आज पोलीस निरीक्षक समाधान नागरे व त्यांच्या पोलीस पथकाने इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती पी. पी. गिरी यांनी 5 जणांचा जामीन मंजूर करून उर्वरीत 20 जणांचा आजही जामीन नाकारत 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या नंतर सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, सर्व संशयित आरोपींनी अमली व मादक पदार्थ जवळ बाळगून सेवन केल्या प्रकरणी व वापराबाबत अधिक तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात यावे असा युक्तिवाद केला.

सरकारी वकीलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने यातील तीन कामगार, एक फोटो ग्राफर, एक स्वयंपाकी असे एकुण 5 जनांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, उर्वरीत आरोपींना एका दिवसाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलीसांकडून 2 बंगले सील करुन कारवाई करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी शनिवार 26 जून मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती.

इतर बातम्या: इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांची रेव्ह पार्टी

हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, दिग्गज अभिनेत्रींसह बॉलिवूड कोरिओग्राफर पोलिसांच्या ताब्यात

(Nashik Igatpuri High Profile Rave Party court approved bail to five accused related to case)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.