नाशकात एक बिबट्या जेरबंद, एक मोकाट!

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे एका बिबट्याला (Nashik leopard) जेरबंद करण्यात वनविभागाला (Forest) यश आलंय.

नाशकात एक बिबट्या जेरबंद, एक मोकाट!
नाशिकमध्ये दुसरा बिबट्या पकडला.
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 5:28 PM

नाशिकः इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे एका बिबट्याला (Nashik leopard) जेरबंद करण्यात वनविभागाला (Forest) यश आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या हुलकावणी देत होता. मात्र, दुसरीकडं नांदूरवैद्य येथे एका शेतकऱ्याच्या घराजवळच्या गोठ्यातील पाळीव श्वानावर हल्ला करून दुसऱ्याच बिबट्यानं त्याचा फडशा पाडल्याचं समोर आलंय. त्यामुळं पंचक्रोशीतल्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरणय. (one leopard in a nashik forest trap)

गेल्या अनेक दिवसांपासून बेलगाव कुऱ्हे आणि नांदूरवैद्य पंचक्रोशीत बिबट्याचा मुक्त संचार सुरूय. त्यामुळं शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीही भीती वाटतेय. बेलगाव कुऱ्हे येथील एका पोल्ट्री शेडजवळ मंगळवारी सायंकाळी वनविभागानं पिंजरा लावला होता. पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला सावज म्हणून एक शेळी बांधली होती. शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या पहाटे चारच्या सुमारास या पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्यातनं बाहेर पडण्यासाठी त्यानं लोखंडी जाळ्यांना धडका दिल्या. त्यामुळं तो रक्तबंबाळ झाला. चवताळलेल्या बिबट्यानं डरकाळ्यांनी परिसर दणाणून सोडला. त्याला पाहण्यासाठी सकाळपासूनच परिसरातल्या नागरिकांची तोबा गर्दी जमली. अखेर भुलीचं इंजेक्शन देऊन या आक्रमक झालेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं. पिंजरा रेस्क्यू व्हॅनला लावून वनविभागाचे अधिकारी त्याला घेऊन गेले. त्याला आता सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणारंय.

दुसऱ्या बिबट्याचा श्वानावर हल्ला

इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे एका शेतकऱ्याच्या घराजवळच्या गोठ्यातील पाळीव श्वानावर हल्ला करून बिबट्यानं त्याचा फडशा पाडला. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळं परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी होतेय. नांदूरवैद्यच्या पंचक्रोशीत गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्याला पाहिले आहे. भक्ष्य शोधण्यासाठी दुपारी देखील बिबट्याचा परिसरात वावर आहे. नांदूरवैद्य ते वंजारवाडी भागात उसाची शेती जास्त आहे. ती बिबट्याच्या आश्रयासाठी सुरक्षित ठिकाण आहे. या भागात कुक्कुट पालनही केलं जातं. येथे चार पोल्ट्री फार्म आहेत. त्यामुळं शिकारीच्या शोधात या परिसरात बिबट्याच्या फेऱ्या वाढल्या आहेत. एक बिबट्या जेरबंद करताच आता दुसऱ्यानं दर्शन दिल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे.

शेतकरी धास्तावले

नांदूरवैद्य येथील शिवाचा ओहोळ, सायखेडे मळा, कर्पे मळा भागात नागरिकांनी बिबट्याला पाहिलंय. एक बिबट्या जेरबंद करताच गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी बिबट्यानं हल्ला करून श्वानाचा फडशा पाडल्यानं तालुक्यात दुसरा बिबट्या असल्याचं समोर आलंय. काही महिन्यांपूर्वीही बिबट्यानं या परिसरात हजेरी लावली होती. सायखेडे मळा परिसरात एका गायीवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली होती. आता बुधवारी रात्री दोनच्या सुमारास कर्पे मळ्यामध्ये बिबट्यानं एका श्वानावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. त्यामुळं परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी केली आहे.

गेल्यावर्षीही वावर

बेलगाव कुऱ्हे पंचक्रोशीत गेल्या वर्षीही बिबट्याचा वावर होता. त्यानं अनेक गायी, म्हशी, वासरे, श्वान आदी पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते. शेवटी नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागानं एका पोल्ट्री शेडजवळ पिंजरा लावला. त्यावेळेही या जाळ्यात बिबट्या अलगद अडकला आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. (one leopard in a nashik forest trap)

संबंधित बातम्याः 

नाशिकमध्ये पालिका निवडणुकीआधी मनसे सक्रीय, प्रत्येक मनसैनिकाच्या घरावर झेंडा फडकावणार

भाकरीच्या चंद्राला महागाईचं ग्रहण; 8 महिन्यांत गॅस सिलिंडर दर 190 रुपयांनी वाढले

अहो आश्चर्यम्, नाशकातून शेकडो नाले चोरीला!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.