Nashik: ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन, बोक्या सातबंडे फेम अभिनेत्यासोबत मुलांनी मारल्या गप्पा

शहरात संपन्न होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल साहित्य मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते.

Nashik: ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन, बोक्या सातबंडे फेम अभिनेत्यासोबत मुलांनी मारल्या गप्पा
94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 2:39 PM

नाशिकः शहरात संपन्न होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhawalkar) यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल साहित्य मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते. साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात जे झाले नाही ते नव-नवीन उपक्रम यंदाच्या नाशिकच्या संमेलनात (Sahitya Sammelan) आपण घेत आहोत, अशी माहिती छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दिली. तसेच यामध्ये चित्रकलेसह विविध कलांना स्थान दिले आहे. मुलांमध्ये बालपणापासूनच साहित्याची आवड निर्माण व्हावी, हा या बाल साहित्य मेळाव्याचा महत्वाचा उद्देश असल्याचे सांगत बालसाहित्य मेळाव्यास मिळालेला प्रतिसाद बघता यापुढील होणाऱ्या साहित्य संमेलनात देखील बालकवी मेळाव्याचा सहभाग असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुस्तकांची संगत सोडू नका- दिलीप प्रभावळकर

यावेळी दिलीप प्रभावळकर म्हणाले की, आजकालची मुलं अधिक स्मार्ट झाली आहे. प्रत्येकात कुठलीना कुठली कला असते ती बाहेर पडली पाहिजे. आपल्यात जी कला आहे ती दाबून न ठेवता व्यक्त करावी यामध्ये पालकांनी देखील विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वाचलेलं सांगल साहित्य लिहायला प्रेरणा देते. बालकांनी साहित्याशी दोस्ती करावी. त्यांनी पुस्तकाची संगत साहित्याची साथ सोडू नये असे सांगत दरदरोज तीनचार ओळींचे लिखाण करत पुस्तकाची तीन चार पाने दररोज वाचावी असे आवाहन त्यांनी केली.

बोक्या सात बंडे, तात्या विंचू पात्रांविषयी मुलांशी गुप्पा

यावेळी दिलीप प्रभावळकर यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला बालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रभावळकर यांनी दिली दिलखुलास उत्तरे देत त्यांनी चित्रपटात चिमणराव, बोक्या सात बंडे, तात्या विंचू, चौकट राजा, नारबा, आबा टिपरे यासह केलेल्या विविध भूमिकाबाबतचा पट मुलांसमोर उभा केला. तसेच बालकुमार साहित्य मेळाव्यात हजर राहण्याची संधी मिळाली याचा आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित बालसाहित्य मेळाव्यात लिटिल चॅम्प फेम ओमकार कानिटकर व जय गांगुर्डे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध गाण्याचे सादरीकरण यावेळी केले. याला बालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

बाल चित्रकारांनी रेखाटली सुंदर चित्रे

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात इतिहासात पहिल्यांदाच बालसाहित्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बाल साहित्य मेळाव्यात अनेक बाल चित्रकारांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी या बालकरांनी विविध सुंदर चित्रे रेखाटली. या बाल मेळाव्यात ३ वर्षाची ओजस्वी काने ही चिमुकली चित्र कलाकार देखील सहभागी झाली. तसेच इयत्ता ५ वीत शिकणारा मयुरेश आढावा या विद्यार्थ्याने रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन याठिकाणी लावण्यात आले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

इतर बातम्या-

मोठी बातमी: औरंगाबादच्या सक्तीच्या लसीकरणाविरोधात हायकोर्टात याचिका, मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचा आरोप!

Devendra Fadnavis: संजय राऊतांचे नेते बदलले; देवेंद्र फडणवीसांनी घेतली तीन नेत्यांची नावे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.