नाशिकः नाशिकमधील बेरोजगार तरुणांची एक खूशखबर. आता त्यांना नोकरीची संधी देण्यासाठी चक्क नाशिकमध्येच येत्या 24 ते 28 जानेवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने हेल्थकेअर रोजगार मेळाव्याचे (job fair) आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे आणि नोकरीच्या संधी पटकावाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
येथे आहेत रिक्तपदे
मेळाव्यामध्ये अनेक रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने सॅनिटरी हेल्थ हेड, डायबिटीज असिस्टंट, मेडिकल इक्विपमेंट टेक्नॉलॉजी असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट, अम्ब्युलन्स चालक, वॉर्डबॉय आदी जागांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा भरातील अनेक रुग्णालयात या मेळाव्यातून भरती होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. कोरोना परिस्थितीमुळे उमेदवारांच्या मुलाखती या मोबाईल अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहेत. त्यामुळे घरबसल्या या मेळाव्याचा लाभ घ्या आणि नोकरी मिळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा करावा अर्ज
नाशिक जिल्ह्यात ज्या संस्थामध्ये पदे भरायची आहेत, त्याची माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर संबंधित संस्था अपडेट करणार आहेत. त्यानुसार उमेदवाराला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरला असेल त्यांच्या संबंधित संस्थाकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी केली आहे, त्यांचाच इथे विचार केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी ही नोंदणी केली नाही त्या बेरोजगारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा प्ले स्टोअरमधून mahaswayam अॅप डाऊनलोड करून नोंदणी करावी. त्यानंतर लॉगीन करून अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अडचणी असल्यास येथे साधा संपर्क
रोजगार मेळाव्यात ज्या कंपन्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे भरावीत. त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhaya Job Fair ऑप्शनवर क्लीक करून NASHIK HEALTH CARE JF – 8 (2021-22) येथे जी रिक्तपदे भरायची आहेत, त्याची नोंद करावी. याबाबत काही अडचणी असल्यास 0253-2972121 या फोन क्रमांकावर किंवा nashikrojgar@gmail.com या ई-मेल आयडीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nashik | नाशिक बाजार समितीत 500 कोटींचा घोटाळा; भाजपची ‘ईडी’कडे तक्रार, प्रकरण काय?
Nashik | 127 किमी वेगाने दुचाकी झाडावर आदळली; 2 मित्र 30 फूट खोल खड्ड्यात पडून गतप्राण
Nashik | थाप मारून थापाड्या गेला, मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत नणंद-भावजयीला 43 लाखांना फसवले