Video : नाशिकमध्ये बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार, वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न

नाशिकच्या जयभवानी परिसरात आढळलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे. वन विभागाला बिबट्याला डाट मारण्यात यश आलं आहे. बिबट्याला डाट मारल्यानंतर तो बेशुद्ध झालाय का हे वनविभागाकडून पाहण्यात येत आहे.

Video : नाशिकमध्ये बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार, वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न
Nashik Leopard
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 1:47 PM

नाशिक: नाशिकच्या (Nashik) जयभवानी रोड (Jay Bhavani Road) परिसरात आढळलेल्या बिबट्याला (Leopard) डाट मारण्यात वनविभागाला यश आलं आहे. मात्र, बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरु आहेत. बिबट्याला डाट मारल्यानंतर तो बेशुद्ध झालाय का हे वनविभागाकडून पाहण्यात येत आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यात यश आलं आहे. नाशिकमधील थरार अजूनही सुरु आहे. परिसरातील नागरिकांनी यामुळं सुटकेचा निश्वास टाकला नाही. बिबट्या सकाळी नाशिकच्या वस्तीच्या ठिकाणी आढळून आला होता. पोलिसांनी या परिसराची नाकेबंदी केली होती. त्या परिसरात येणारी गर्दी कमी करण्यात पोलिसांना यश आलं आहे. बिबट्याला पकडण्या वनविभागाला यश आल्यानं गेल्या तीन ते साडेतीन तासांपासून सुरु असलेल्या थरारनाट्याला पूर्ण विराम मिळाला आहे. नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी बिबट्या आढळून आला होता. वन विभागाकडून बिबट्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार का हे पाहावं लागणार आहे.

जयभवानी रोड परिसरातील एका इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद

नाशिक शहरातील जयभवानी रोड परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये बिबट्या आढळून आला. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. बिबट्या नागरी वस्तीत आल्याची बातमी कळताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

पाहा व्हिडीओ

एक जण जखमी झाल्याची माहिती

जयभवानी रोड परिसरात आढळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्या आढळल्यानं परिसरातील रस्ते पोलिसांकडून बंद करण्यात आले होते. मात्र, आता बिबट्याला पकडण्यात आल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तीन तासांपासून थरार

जयभवानी रोड परिसरात बिबट्या आढळून आल्यानंतर वनविभागाचं एक पथक परिसरात दाखल झालं होतं. या पथकानं सापळा देखील आणला होता. दहाच्या सुमारास बिबट्या आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. अखेर वनविभागाच्या पथकानं  बिबट्याला डाट मारण्यात यश आलं आहे.

नागरिकांच्या गर्दीमुळं शोध कार्यात अडचण

जयभवानी रोड परिसरात बिबट्या आढळल्यानं परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. या गर्दीमुळं वनविभागाला बिबट्याला पकडण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर बिबट्याला डाट मारण्यात यश आलं आहे. डाट मारल्यानंतर तो बेशुद्ध झालाय का हे पाहावं लागतंय. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. अद्याप बिबट्याला बेशुद्ध करणयाचा प्रयत्न सुरु असल्याचं कळतंय. बिबट्या बिथरण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी गर्दी करु नये, असं आवाहन केलं आहे.

इतर बातम्या:

EVM वोटिंग मशीन मध्ये हेराफेरी रोखण्यासाठी लावलेल्या मायक्रोचिपचं नेमकं काय महत्व आहे? जाणून घेऊया!

Nagin Dance Viral Video : भौतिकशास्त्राचे सर्व नियम मोडणारा ‘असा’ नागीण डान्स पाहिला नसेल, हसून हसून लोटपोट व्हाल!

Nashik Leopard spot in Jay Bhavani Road forest department trying to catch leopard

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.