AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Loudspeaker Policy : फक्त मशीद, मंदिरच नाही, तर विनापरवाने भोंगे लावणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्तांचा हातोडा, सजा आणि इतर डिटेल्सही सांगितले

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय म्हणाले की, शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यात कुणालाही काहीही चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जावे. शासनाचे काही वेगळे आदेश आले, तरच यावर फेरविचार होऊ शकतो.

Nashik Loudspeaker Policy : फक्त मशीद, मंदिरच नाही, तर विनापरवाने भोंगे लावणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्तांचा हातोडा, सजा आणि इतर डिटेल्सही सांगितले
दीपक पांडेय, पोलीस आयुक्त, नाशिक.
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 9:48 AM

नाशिक : ऐन नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोंग्यावरून वातावरण तापते आहे. हेच पाहता शहरातील सर्व धार्मिक स्थळांनी आणि इतरांनीही येत्या 3 मे पर्यंत भोंगे (Loudspeaker) लावण्यासाठी परवानगी घ्यावी. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करून हे भोंगे काढले जातील. नियम तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांना थेट जेलची हवा खावी लागू शकते, असे महत्त्वाचे आदेश (Order) पोलीस (P0lice) आयुक्त दीपक पांडेय यांनी काढलेत. याबद्दल टीव्ही 9 मराठीने त्यांच्या संवाद साधला असता, त्यांनी यात कसलाही बदल होणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. राज्य घटनेनुसार साऱ्यांना आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र, कोणीही सामाजिक सहिष्णुता बिघडेल असे वर्तन करू नये. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. आधी हेल्मेटसक्ती, नंतर महसूल खात्याविरोधातला लेटरबॉम्ब आणि आता भोंग्याचे आदेश यामुळे दीपक पांडेय पुन्हा चर्चेत आलेत.

तर कोर्टात जा…

पोलीस आयुक्त दीपक पांडेय म्हणाले की, मुस्लीम समाज, मर्कज संस्था, शासन निर्णय, सुप्रीम कोर्टाचा 18 जुलै 2005 रोजीचा निर्णय, विशेष शाखा लॉ ऑर्डर रिपोर्ट हे सारे लक्षात घेऊनच आपण भोंग्यासंबंधीचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त म्हणून शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यात कुणालाही काहीही चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जावे. शासनाचे काही वेगळे आदेश आले तरच यावर फेरविचार होऊ शकतो.

थेट जप्तीची कारवाई…

पोलीस आयुक्त दीपक पांडेय म्हणाले की, मशीद, मंदिर, गिरीजाघर, चर्च, गुरुद्वारा सर्वच धार्मिक स्थळांसाठी हे आदेश लागू आहेत. त्यांनी आपल्या प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घेतली नसेल, तर घ्यावी. त्यासाठी 3 मे पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर जिथे परवानगी नाही, तिथे पोलिसांच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात येईल.

आवाजाची मर्यादा पाळा…

पोलीस आयुक्त म्हणाले की, या धार्मिक स्थळांनी आवाजाच्या पातळीची मर्यादा पाळावी. सरकारच्या 2009 च्या जीआरनुसार औद्योगिक, कर्मचारी, रहिवासी, शांतता असे चार विभाग केले आहेत. दिवसपाळी आणि रात्रपाळीच्या अनुषंगाने काही नियम केले आहेत. संबंधित ठिकाणच्या नियमानुसार 10 डेसिबल ते 75 डेसिबल पर्यंत जी ध्वनीपातळीची मर्यादा असेल ती पाळावी लागेल. अन्यथा कठोर कारवाई करू. त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, एमआयडीसी यांना निर्देश दिले आहेत. त्यांच्या विभागातील धार्मिक स्थळांची यादीही मागवली आहे.

अन्यथा होऊ शकते शिक्षा…

पोलीस आयुक्त पांडेय म्हणाले की, हनुमान चालीसा असो, की अजून काही. प्रत्येक व्यक्तीला धर्माचा, प्रचार, प्रसार, पालनाचा अधिकार दिला आहे. मात्र, हे सारे सार्वजनिक सुव्यवस्था पाळून करायचे आहे. ज्या-ज्या ठिकाणी मशिदी आहेत, तिथे पाचवेळा अजान होतो. याच्या वेळा ठरलेल्या आहेत. अजानच्या वेळेपूर्वी पंधरा मिनिटे आणि त्या काळात तुम्हाला मशिदीच्या शंभर मीटरच्या आत दुसऱ्यांना ध्वनिप्रदूषण वगैरे करता येणार नाही. कारण एका व्यक्तीचे अधिकार संपतात, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचे अधिकार सुरू होतात. त्यानंतरही कोणी ऐकणार नसेल, तर थेट कारवाई करू. त्यात 4 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यात दंड वेगळा असेल. तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तडीपारी होऊ शकते. 6 महिन्यांसाठी अटक करून तुरुंगात टाकू शकतो. त्यामुळे साऱ्यांनी नियम पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!