नाशिक जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर, पाहण्यासाठी लोकांची गर्दी

घराच्या चारही बाजूंना बुरुजांचा आकार देण्यात आलाय. घराचा दरवाजा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखा महाकाय आहे. त्याचबरोबर घराच्या बाहेरील बाजूला तोफा बसवण्यात आलेत.

नाशिक जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर, पाहण्यासाठी लोकांची गर्दी
nashikImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 9:12 AM

मालेगाव : आपलं घर हे इतरांपेक्षा हटके पद्धतीचं असावं, सर्वांच्या लक्षात राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही देखील अशी हटके पद्धतीनं सजलेलं घर पाहिलं असेल. पण, अगदी हुबेहुब किल्ल्याच्या (fort) स्वरुपातील घर तुम्ही पाहिलं आहे का? नाशिक (nashik) जिल्ह्यातील मालेगावात एका शिवप्रेमी डॉक्टर यांनी हुबेहुब ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर बांधलं आहे. त्यांनी बांधलेलं हे घर सध्या परिसरात आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्यामुळे त्यांचं घर पाहायला मित्रमंडळ (nashik viral news) त्याचबरोबर परिसरातील लोकं येत आहेत. भागात डॉक्टरांचं घर चर्चेचा विषय ठरला आहे.

घराच्या चारही बाजूंना बुरुजांचा

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डॉ. संतोष पाटील या तरुणानं अगदी किल्ल्यासारखं घर बांधलंय. घराच्या बाहेरील बाजूस ऐतिहासिक किल्ल्यासारखा दिसणार घर बांधले आहे. घराच्या चारही बाजूंना बुरुजांचा आकार देण्यात आलाय. घराचा दरवाजा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखा महाकाय आहे. त्याचबरोबर घराच्या बाहेरील बाजूला तोफा बसवण्यात आलेत. प्रवेशद्वारावर दारु पिऊन आणि गुटखा खाऊन येणाऱ्यास प्रवेश नाही असे देखील लिहिण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

तिथं गेल्यानंतर अनेकांना एखाद्या किल्ल्याचा भेट दिल्यासारखं वाटतं आहे. त्याचबरोबर लहान मुलं सुध्दा त्या ठिकाणी भेट देत असून अधिक रमत आहेत.

महाराष्ट्रात ग्रामीण भागात अशा पद्धतीची अनेक घरं पाहायला मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली या गावात सदाशिव पाटील यांनी सुध्दा अशा पद्धतीने अनेक वस्तूंची जपणूक केली आहे. त्यांच्याकडे अनेक शिवकालीन वस्तू आहेत. त्याचबरोबर त्यांनी सुध्दा त्यांच्या घराच्या बाहेर तोफा ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांचं घर सुध्दा अनेक लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र झालं आहे. अनेक लोकं त्यांना खास भेटायला जातात.

काही व्यवसायिकांनी हॉटेल किल्ल्यांसारखे बांधल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांची नावं सुध्दा तशीचं आहेत.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.