नाशिकमध्ये पावसाची उघडीप, पाणी कपात कायम राहणार, महापालिका आयुक्तांची माहिती
नाशिक जिल्ह्यात आठ दिवसात पावसानं हजेरी लावल्यानं पाणी कपातीच्या संकटातून नाशिककरांना दिलासा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, अजून एक महिनाभर पाणी कपात सुरु राहणार असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं आहे.
नाशिक: मान्सूनच्या पावसानं जून महिन्यात नाशिक जिल्ह्यात ओढ दिल्यानं नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट ओढावलं आहे. नाशिक जिल्ह्यात आठ दिवसात पावसानं हजेरी लावल्यानं पाणी कपातीच्या संकटातून नाशिककरांना दिलासा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, अजून एक महिनाभर पाणी कपात सुरु राहणार असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सध्यातरी नाशिककरांना दिलासा मिळणार नाही.
महिनाभर पाणी कपात कायम राहणार
नाशिक जिल्ह्यात पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने पाणी कपात पुढील महिनाभर कायम राहणार असल्याचा खुलासा महापालिका आयुक्तांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं पाणी कपात रद्द होईल, अशा चर्चा होत होत्या. सध्या शहरात दर गुरुवारी पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. गंगापूर धरणात आतापर्यंत फक्त 58 टक्केच पाणीसाठा झाला आहे.
दर गुरुवारी पाणी कपात
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात पाणी कमी प्रमाणात असल्यानं पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी असणार पाणी कपात सुरु ठेवण्यात आली आहे. महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेसमोर थकबाकी वसुलीचं आव्हान
नाशिक महापालिकेनं शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. कोरोना काळात घरपट्टी,पाणीपट्टी थकवल्याने मनपाच्या तिजोरीत मोठी घट आली आहे. आतापर्यंत महापालिकेची थकबाकी 400 कोटींपर्यंत गेली आहे. नाशिक महापालिकेचे पाणीपट्टीचे एकूण 20 हजार पेक्षा अधिक थकबाकीदार आहेत. त्यापैकी शहरात 7 हजार थकबाकीदार आहेत. थकबाकीदारांना 7 दिवसात थकीत पाणीपट्टी भरण्याचा दिला अल्टीमेटम,अन्यथा नळ कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या वतीनं देण्यात आला होता.
इगतपुरीतील धावली धरण 95 टक्के भरलं
इगतपुरी तालुक्यात पावसाने गेला एक महिना दडी मारली होती. त्यामुळे येथील नागरिक व बळीराजा चिंता ग्रस्त झाला होता. परंतु गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणाऱ्या भावली धरणातील पाणी साठा वाढला आहे. दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या दीड हजार दस लक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे तसेच दरम्याण दारणा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेले भावली धरणातील पाणीसाठा दारणा धरणात सोडून पुढे जायकवाडीला सोडण्यात येते. संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या भावली धरणावर आहे भावली धरण आज सकाळी 95 टक्के भरले असून असाच पाऊस सुरू राहीला तर येत्या 1 ते 2 दिवसात हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहील.
इतर बातम्या:
निफाडमध्ये मुसळधार, नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग, मराठवाड्याला दिलासा
(Nashik Municipal Corporation Commissioner said water cut of city will continue till next month)