घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी नाशिक महपालिकेची आनोखी युक्ती, थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवणार

शहरात अनेकांनी घरपट्टी तसेच पाणीपट्टीचा कर थकवला आहे. थकबाकी वसूल होत नसल्याने महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. अखेर थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे.

घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी नाशिक महपालिकेची आनोखी युक्ती, थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवणार
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 1:36 PM

नाशिक :  शहरात अनेकांनी घरपट्टी तसेच पाणीपट्टीचा कर (Tax) थकवला आहे. थकबाकी वसूल होत नसल्याने महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) अडचणी वाढल्या आहेत. अखेर थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. हा थकबाकीचा आकडा तब्बल पाचशे कोटींवर पोहोचला आहे. ही थकबाकी वसूल कशी करायची असा मोठा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला होता. मात्र आता यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता जे बडे थकबाकीदार आहेत, त्यांच्या घरासमोर ढोल वाजवण्यात येणार आहे. ढोल वाजवून त्यांना पाणीपट्टी आणि घरपट्टीचा कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. यानंतर देखील त्यांना कर न भरल्यास त्यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, सोफासेट सारख्या वस्तुंवर महापालिकेच्या वतीने जप्ती आणण्यात येणार आहे.

घरापुढे ढोल वाजवणार

पाणीपट्टी आणि घरपट्टी हे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असते, मात्र अनेक जण ती भरत नाहीत. कर वसुली न झाल्याने उत्पन्नात घट होते. त्यामुळे महसुलाला मोठा फटका बसतो. आता नाशिक महापालिकेने अशा थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. जे बडे थकीबाकीदार आहेत त्यांच्या घरापुढे जाऊन ढोल वाजवण्यात येणार आहे. घरासमोर ढोल वाढवल्याने तरी ते घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरतील अशी अपेक्षा महापालिकेला आहे.

…तर घरातील वस्तूंवर जप्ती

नाशिकमध्ये अनेकांनी पाणीपट्टी आणि घरपट्टी थकवली आहे. थकीत पाणी आणि घरपट्टीचा आकाड हा तब्बल पाचशे कोटींवर पोहोचला आहे. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी आता महापालिकेच्या वतीने बड्या थकीबाकीदाराच्या घरासमोर ढोल वाजवण्यात येणार आहे. ढोल वाजवून देखील पैसे न दिल्यास आशा थकीबाकीदाच्या घरातील वस्तू जप्त करण्यात येणार आहेत. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, सोफासेठ अशा विविध गोष्टींचा समावेश असणार आहे.

संबंधित बातम्या

Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…

Sugarcane Fire : महावितरणचा असा हा ‘शॉक’, गतवर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती, उसाचे क्षेत्रही अ्न कारणही तेच

Suresh Bhat Jayanti Special : जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला, कापले गेलो तरी, तोडले नाही तुला…!

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.