AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona Update | कोरोनाला थोपवण्यासाठी मास्टर प्लॅन, बाजारात खरेदीसाठी आता पास लागणार, नवे नियम कोणते?

कोरोनाचा हा धोका ओळखून आता नाशिक प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांनी गर्दी करु नये म्हणून बाजारात खरेदीसाठी नाशिककरांना आत पास लागणार आहे. (nashik corona spread pass compulsory)

Nashik Corona Update | कोरोनाला थोपवण्यासाठी मास्टर प्लॅन, बाजारात खरेदीसाठी आता पास लागणार, नवे नियम कोणते?
NASHIK
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 7:54 PM

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहा:कार उडवला आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. नाशिकसारख्या मोठ्या शहरामध्ये तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. कोरोनाचा हा धोका ओळखून आता नाशिक प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांनी गर्दी करु नये म्हणून बाजारात खरेदीसाठी नाशिककरांना आत पास लागणार आहे. या पास मोफत मिळणार असून फक्त पास असणाऱ्यांनाच बाजारपेठेत प्रवेश दिला जाईल. विशेष म्हणजे नागरिकांनी पास नसूनसुद्धा बाजारपेठेत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा दंड घेतला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होईल. (Nashik municipal takes big decision to stop Corona spread from monday pass will be compulsory shopping in market)

खरेदीसाठी आता पास लागणार

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर आगामी दिवसांत कोरोनाला थोपवणे अवघड होणार आहे. हा धोका लक्षात घेऊन नाशिकमध्ये कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये बाजारपेठेत खरेदी करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाने बाजारपेठेत येण्यासाठी पास सक्तीचे केले आहे. जवळ पास नसेल तर बाजारपेठेत येता येणार नाहीये. हा नियम मोडल्यास नागरिकांकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

खरेदी करण्यासाठी फक्त एक तास

बाजारपेठांसाठी पास लागू करण्याचा निर्णय झाल्यामुळे यानंतर येथील नागरिकांना पास घेऊन फक्त एक तास बाजारपेठेत थांबता येणार आहे. एका तासात खरेदी करुन नागरिकांना बाजारपेठेच्या बाहेर पडावे लागेल. यापेक्षा जास्त वेळ थांबल्याचे आढळल्यास, प्रशासनाकडून दंड आकारला जाणार आहे. सध्या शहरातील मुख्य बाजारपेठा बॅरिकेड्सच्या साहाय्याने सील करण्यात करण्यात आल्या आहेत.

याआधी 5 रुपयांचे शुल्क घेतले जायचे

याआधी नाशिक मनपाने गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या होत्या. याआधी बाजारपेठेत यायचे असेल तर 5 रुपयांचे शुल्क मनपाकडून घेतले जात होते. मात्र तरीसुद्धा गर्दी होत असल्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, नाशिक प्रशासनाने पास बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे याला नाशिककरांचा प्रतिसाद कसा असेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Nashik Corona | नाशिकच्या जिल्हा शल्यचिकित्सक सक्तीच्या रजेवर, छगन भुजबळ आढावा बैठकीत का संतापले?

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.