Chhagan Bhujbal : कंत्राटी भरतीवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया; म्हणाले, तो विषय आता…

Chhagan Bhujbal on Contract Recruitment : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी कंत्राटी कामगार भरतीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच जयदत्त होळकर यांनी साथ सोडल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत. छगन भुजबळ वाचा...

Chhagan Bhujbal : कंत्राटी भरतीवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया; म्हणाले, तो विषय आता...
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 10:13 PM

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- टीव्ही 9, नाशिक | 21 ऑक्टोबर 2023 : कंत्राट भरतीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. या मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे सरकारला घेरण्यात येतंय. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी यावर काही बोलणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. यापुढे कंत्राटी भरती करणार नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. त्यालाही छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. माझं नाव घेतलं की नाही माहिती नाही. माझा काही संबंध नाही. त्या फॅक्टीमध्ये जे काही बनत होतं. ते सर्वसामान्यांना माहिती नव्हतं. याची चौकशी व्हायला पाहिजे. यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही, असं छगन भुजबळ म्हणालेत.

कुणी 16 लाख कुणी 16 कोटी काहीही म्हणेल याला काही अर्थ नाही. काही लोक म्हणतात, छगन भुजबळ यांच्याकडे 6 हजार कोटींची मालमत्ता आहे…. तर घेऊन जा… मला फक्त 500 कोटी द्या… सर्व मालमत्ता घेऊन जा. हे लोक प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात. नसते आरोप करतात, असं म्हणत छगन भुजबळ यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

ललित पाटील हा कोणत्या पक्षात होता? पोलिसांनी शेवटच्या पातळीपर्यंत शोध घेतला पाहिजे. जगात कुठे कुठे ड्रग्स जात होतं. याची माहिती घेऊन साखळी तोडली पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक जयदत्त होळकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी छगन भुजबळ यांची साथ सोडल आहे. त्यावर बोलताना प्रत्येकाची वेगवगळी कारणं असतात. दाखवायला एक कारण असतं. खरं कारण दुसरंच असतं. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. तिथे काही उमेदवार निवडून आलेत मग आपले काय होणार याची काळजी असते. भुजबळ शिवसेना, भाजप यांच्याबरोबर अजित पवार गटात काम करतात. आपलं पुढे काय होणार याची काळजी अनेकांना असते. आता येवला लासलगावची जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करत राहणार, असंही छगन भुजबळ म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.