गाइड होण्यासाठी मिळणार मोफत प्रशिक्षण, पर्यटन संचालनालयाच्या नाशिक कार्यालयाचा अभिनव उपक्रम काय?
राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाइड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पर्यटन संचालनालयाच्या नाशिक उपसंचालक कार्यालयामार्फत नाशिक विभागात नाशिक शहर, अहमदनगर शहर, भंडारदरा येथे विनामूल्य पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकः तुम्हाला फिरण्याची (Tourism) आवड आहे. त्यातून पैसाही कमवायचा आहे. तर गाइड (Guide) होण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (DOT) मोफत प्रशिक्षण देणार आहे. राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाइड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पर्यटन संचालनालयाच्या नाशिक उपसंचालक कार्यालयामार्फत नाशिक विभागात नाशिक शहर, अहमदनगर शहर, भंडारदरा येथे विनामूल्य पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालय, नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी दिली आहे.
पहिली बॅच सुरू…
नाशिकमधील पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रमास 23 फेब्रुवारी 2022 रोजी सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुंबई येथील अधिकारी योगेश गिरगुडे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम ब ट्रॅव्हल मॅनेजमेंट (IITTTM) ग्वालियर येथील प्रशिक्षक चंद्रशेखर बरूआ, पर्यटन संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. नाशिकमध्ये पर्यटन विकासाला खूप मोठया प्रमाणात वाव असून पर्यटक मार्गदर्शकांना त्याद्वारे रोजगार उपलब्ध होवू शकतो. शासनातर्फ हे प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. 27 फेब्रुवारी 2022 पर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे.
पुढील महिन्यात दोन बॅच…
पर्यटन संचालनालयाचा गाइड प्रशिक्षण कार्यक्रम मार्चमध्येही होणार आहे. अहमदनगर येथे 1 ते 5 मार्च 2022 पर्यंत 50 प्रशिक्षणार्थींसाठी व 7 ते 11 मार्च 2022 पर्यंत भंहारदरा येथे 50 प्रशिक्षणार्थींना गाइड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाच दिवसांचे हे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुढे टूर गाइड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्रही देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालयाच्या नाशिक उपसंचालक कार्यालयात संपर्क साधावा.
पर्यटन संचालनालयाच्या नाशिक उपसंचालक कार्यालयामार्फत नाशिक विभागात नाशिक शहर, अहमदनगर शहर, भंडारदरा येथे विनामूल्य पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा तरुणांनी लाभ घ्यावा. त्यांना प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र, ओळख देण्यात येईल. – मधुमती सरदेसाई, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक
नाशिक विभागात येथे उपक्रम
– नाशिक शहर – 23 ते 27 फेब्रुवारी
– अहमदनगर शहर – 1 ते 5 मार्च
– भंडारदरा – 7 ते 11 मार्च
इतर बातम्याः
युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!
युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सुरू; कुठे मिळेल मदत?