Nashik Crime | नाशिकमध्ये ओली Party करणारे Police निलंबित; आमदारांच्या भेटीनंतर कारवाई
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका भाजप कार्यकर्त्याचा शहरात खून झाला. त्या आठवड्यात एकूण तीन खून झाले. या प्रकरणाचे थेट विधिमंडळात पडसाद उमटले. त्यानंतर दरोडे आणि चोऱ्यांचाही सुळसुळाट सुरूच आहे.
नाशिकः नाशिक (Nashik) मध्ये चक्क पोलीस चौकीतच ओली पार्टी (Party) करत तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या 4 पोलिसांवर (Police) अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी आमदार सीमा हिरे यांना पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करावी लागली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आमदार हिरे यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासमोर मद्यपी पोलिसांची तक्रार केली. त्यांनी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला कशी वागणूक दिली, याची कैफियत मांडली. त्यानंतर आयुक्तांनी इतर चौक्यांचाही आढावा घेऊन तेथील काम ठीक नसेल, तर त्या बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, एकीकडे जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. गेल्या दोन महिन्यांत तर लागोपाठ दरोडे पडले. त्यापूर्वी झालेले खून यामुळे नाशिकमध्ये गुन्हेगारीत होणारी वाढ पोलिसांनाही आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी आहे.
तक्रारदारालाच केली मारहाण
गंगापूर पोलीस ठाण्याच्या दादाजो कोंडदेव पोलीस चौकीत एक तक्रारदार तक्रार करण्यासाठी गेले. काही टवाळखोर दारू पिऊन त्रास देत असल्याची त्यांची कैफियत होते. मात्र, ते तक्रारदार ज्यांच्याकडे गेले, ते पोलिसच टेबलवर बाटल्या मांडून प्यायला बसलेले दिसले. याचा तक्रारदाराला पहिला धक्का बसला. त्याने पोलिसांचा कारनामा मोबाइलमध्ये शूट केला. तेव्हा पोलिसांनी त्यांनाच मारहाण केली. हा प्रकार पाहून परिसरातले नागरिक जमा झाले. तेव्हा वरिष्ठ पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले.
व्हिडिओ झाला व्हायरल
नाशिकमध्ये गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दादोजी कोंडदेव पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकीतील शिपायांच्या कारनाम्याचे अनेक व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झालेत. मात्र, आता तर या पोलीस चौकीतच पोलिसांनी ओली पार्टी केल्याचे समोर आल्याने खळबळ उडालीय. विशेष म्हणजे या ओल्या पार्टीचा व्हिडिओही व्हायरल झालाय. त्यामुळे पोलिसांची अक्षरशः छि-थू होताना दिसतेय. पोलिसांचे चक्क चौकीतले हे कारनामे पाहून लोक तोंडात बोट घालतायत.
नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका भाजप कार्यकर्त्याचा शहरात खून झाला. त्या आठवड्यात एकूण तीन खून झाले. या प्रकरणाचे थेट विधिमंडळात पडसाद उमटले. त्यानंतर दरोडे आणि चोऱ्यांचाही सुळसुळाट सुरूच आहे. त्यामुळे शहरातील कायदा व्यवस्थेला कोणी वाली आहे की नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
इतर बातम्याः