रंगपंचमीचा ‘धप्पा’ पॅटर्न! राज्यातीलच नाही, तर परदेशी नागरिक सुद्धा रंगपंचमीला येतात, काय आहे कारण?
संपूर्ण देशात 'या' शहरातील रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. राज्यातील कानाकोपऱ्यातील नागरिक रंगपंचमी साजरी करण्यासाठी येत असतात.
नाशिक : संपूर्ण देशात होळीला आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या धूलिवंदनच्या दिवशी रंगउधळले जातात. पण संपूर्ण देशात असं एकमेव शहर आहे, तिथे होळीच्या ( Holi Festival ) च दिवसानंतर रंगउधळले जातात. त्याला रंगपंचमी असे म्हणतात. विशेषतः महाराष्ट्रात ही रंगपंचमी साजरी केली जात असली तरी नाशिक शहरात एका वेगळ्या पद्धतीने ही रंगपंचमी ( Rangpanchami ) साजरी केली जाते. तिला रहाड रंगपंचमी म्हणून ओळखलं जातं. यामध्ये एक विशेष बाब म्हणजे रहाडीत उडी मारली जाते, त्यामध्ये माणूस पूर्ण भिजून जातो त्याला धप्पा मारणे असे म्हणतात. हाच धप्पा मारला नाहीत तर रंगपंचमी साजरी केली जात नाही असा एक मानस आहे.
नाशिक शहरात साजरी केली जाणारी ही रंगपंचमी एकदम खास आहे. पेशवेकालीन हौद म्हणजे रहाड त्यात ही रंगपंचमी साजरी केली जाते. नाशिक शहरात विविध रंगांच्या वेगवेगळ्या रहाडी आहेत. त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात.
नाशिक शहरातील रंगपंचमीचे हे अनोखेपण शेकडो वर्षापासून पळाले जात आहे. 250 वर्षापासून ही परंपरा जपली जात आहे. पेशवेकालीन हौदात म्हणजेच राहाडी इतर वेळेला बुजवून ठेवल्या जातात. पण रंगपंचमीच्या आधी काही दिवस या रहाडी उघडल्या जातात.
या राहाडीतला रंग हा नैसर्गिक पानाफुलांपासून बनविलेला असतो. त्यामुळे या रंगपंचमी पासून कुठलाही धोका नसतो. शहरात तशा भरपूर रहाडी आहेत. मात्र दरवर्षी तीनच रहाडी उघडल्या जातात. आणि तिथे रंगपंचमी साजरी केली जाते.
रहाड आणि त्यांचे रंग ठरलेले असतात. शनि चौक येथील गडद गुलाबी रंग, दिल्ली दरवाजा येथील रहाड केशरी रंग, तिवंधा येथील रहाड ही पिवळ्या रंगाची असते. त्यामुळे नाशिकच्या रंगपंचमीचा एक वेगळाच आनंद असतो.
View this post on Instagram
यातील एक विशेष बाब म्हणजे प्रत्येक रहाडीचा मान आणि व्यवस्था पाहणारे मंडळ आहे. त्यांच्या व्यतिरिक्त यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे वाद किंवा नियोजनात काही अभाव असली कसलीच चिंता नसते.
अलीकडे रेनडान्सच्या संस्कृतीपुढे आजही तितक्याच उत्साहात रहाड संस्कृती टिकून आहे. नाशिककरांचा मोठा उत्साह पाहायला मिळत असतो. आजही रहाडीत उडी घेण्यासाठी म्हणजेच धप्पा मारण्यासाठी मोठी गर्दी होत असते.
विशेष म्हणजे या रंगोत्सवात महिलांची संख्याही लक्षणीय असते. मोठ्या प्रमाणात महिला या रहाडीत धप्पे मारून रंगपंचमी साजरी करत असतात. याच दरम्यान डिजे, रेनडान्सचेही आयोजन असल्याने रंगपंचमीला मोठा उत्साह असतो.
नाशिक शहरात खरंतर अठरा रहाडी होत्या. नंतरच्या काळात त्या रहाडी बुजवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पाच रहाडी दरवर्षी उघडल्या जात होत्या. मात्र, आता तीनच रहाडी उघडल्या जातात. आणि इथेच रंगपंचमी मोठ्या उत्साहात पार पडत असते.