AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या एकूण 10 मान्यवरांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात.

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान
चिन्मय उदगीरकर, पूजा सावंत, सिद्धार्थ जाधव यांना सुविचार गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 3:37 PM

नाशिकः नाशिक येथील प्रतिष्ठित अशा सुविचार गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 5 मार्च रोजी अभिनेता चिन्मय उदगीरकर (Chinmay Udgirkar), अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांच्यासह 10 मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती सुविचार मंचचे आकाश पगार यांनी दिलीय. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्काराने मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असल्याचे पगार म्हणाले.

कशासाठी पुरस्कार?

समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या एकूण 10 मान्यवरांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आली. चित्रपट अभिनेता सिद्धार्थ जाधव यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार नाशिक गौरव या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या मान्यवरांचाही गौरव

हेमंत राठी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ.अतुल वडगावकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा.शं. क. कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडू ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे व जेष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गोरवाडकर हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तींची निवड केली आहे.

प्रवेशिका कोठे मिळतील?

कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संयोजक आकाश पगार यांच्या मोबाइल क्रमांकावर 9421563555 संपर्क साधण्याचे आवाहन सुविचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे. खरे तर 2 जानेवारी 2022 रोजी सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार होता. मात्र, त्यावेळेस वाढलेली कोविड रुग्णांची संख्या व सरकारच्या वतीने लावण्यात आलेले निर्बंध यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.

इतर बातम्याः

युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!

युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सुरू; कुठे मिळेल मदत?

उपमहापौरासह भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला; नाशिकमध्ये फोडाफोडीला वेग!

ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की.
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप.
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?
हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?.
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा
नरकातला स्वर्ग नाही तर गटारातील... राऊतांवर चित्रा वाघ यांचा निशाणा.
लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?
लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?.
'जेवढ्या वेळात लोकं नाश्ता करतात, तेवढ्याच वेळात पाकिस्तानला निपटवलं'
'जेवढ्या वेळात लोकं नाश्ता करतात, तेवढ्याच वेळात पाकिस्तानला निपटवलं'.
'रात के अंधेरे में उजाला..', 15 ब्रह्मोसचा मारा अन् पाकचं कंबरडं मोडलं
'रात के अंधेरे में उजाला..', 15 ब्रह्मोसचा मारा अन् पाकचं कंबरडं मोडलं.
पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली! भारतासोबत शांतता चर्चेसाठी तयार
पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर आली! भारतासोबत शांतता चर्चेसाठी तयार.
ट्रम्प यांना मारण्यासाठी हत्येचा कट, 8647 कोड जारी... नेमका अर्थ काय
ट्रम्प यांना मारण्यासाठी हत्येचा कट, 8647 कोड जारी... नेमका अर्थ काय.