लग्नसोहळा आटोपून घरी परतत होते, पण रात्रीच्या अंधाराने घात केला अन्…

सर्वजण ग्नसोहळ्यावरुन रात्री घरी परतत होते. मात्र घरी पोहचण्याआधीच काळाने घाला घातला आणि रात्रीच्या अंधारात घात झाला.

लग्नसोहळा आटोपून घरी परतत होते, पण रात्रीच्या अंधाराने घात केला अन्...
नाशिकमध्ये कार नदीत कोसळलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 8:54 AM

नाशिक : लग्न सोहळ्यावरुन परतताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरुन खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एका बालिकेसह तिघांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नांदगाव-मालेगाव रस्त्यावर नाग्या-साक्या पुलावर मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला. कारमधील सर्वजण मालेगावहून जालना येथे एका लग्नसोहळ्यासाठी गेले होते. तेथून मालेगावला परतत असताना हा अपघात घडला.

पुलाला कठडे नसल्याने अपघात

नाशिकच्या नांदगाव मालेगाव रोडवर नाग्या-साक्या धरणाच्या समोरील नदीच्या पुलाला कठडे नाहीत. यामुळे अपघाताच्या घटना येथे घडत असतात. जालना येथून एका विवाह सोहळ्याला गेलेले नातेवाईक मालेगावकडे परतत असताना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. पुलाला कठडे नसल्याने रात्रीच्या अंधारात चालकाच्या काही लक्षात आले नाही. गाडी पुलावरुन थेट नदीत कोसळली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकी आणि टेम्पोचा अपघात

जुना पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर एका दुचाकीचा आणि तीन चाकी टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यावरून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने भरधाव वेगात एक दुचाकी जात होती. तितक्यात विरुद्ध दिशेने तळेगाव शहराकडे जाणाऱ्या एका तीन चाकी टेम्पोला दुचाकीची जोरात धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीं दुचाकीस्वाराला नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.