निफाडमधील दुर्मिळ घटना, एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद
नाशकातील कादवा नदी काठवार असलेल्या निफाड़ तालुक्यातील वडाळी नजिक गावात उसाचे मोठे क्षेत्र आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये बिबट्यांचा हैदोस वाढला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद झाल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील वडाळीजवळ वनविभागाने लावलेल्या एका पिंजऱ्यात हे दोन्ही बिबटे जेरबंद झाले आहेत. (Nashik Niphad Two leopards captured in the same cage)
नाशकातील कादवा नदी काठवार असलेल्या निफाड़ तालुक्यातील वडाळी नजिक गावात उसाचे मोठे क्षेत्र आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक बिबटे मोकाट जनावरांसह माणसांवर हल्ले करत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील शेतकरी रोहन होळकर यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद
या मागणीला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देऊन रोहन होळकर यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावला. या पिंजऱ्यात एक नाही तर चक्क दोन बिबिटे एकाच वेळी जेरबंद झाल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. हे बिबटे अंदाजे दीड ते पावणे दोन वर्षाचे आहे. तसेच हे दोन्ही बिबटे मादी जातीचे असून या दोन्ही बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी करण्यात आली आहे.
संपूर्ण गाव बिबट्यामुक्त करा, नागरिकांची मागणी
या तपासणीनंतर त्या दोन्ही बिबट्यांना पुन्हा आदिवासात सोडून देण्यात आले आहे. मात्र या दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले असले तरी या परिसरात आणखी अनेक बिबट्यांचा सहवास आहे. त्यामुले त्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे. तसेच हा संपूर्ण गाव बिबट्या मुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Sugar Side Effects: साखर म्हणजे पांढरं विष; अति गोड खाणाऱ्यांनो साईड इफेक्ट्स जाणून घ्याhttps://t.co/mZgHFtL6UG | #SugarSideEffects | #Sugar | #Healthcare | #Dangerous | #Health | #Healthcaretips | #Food | #immunityboosters | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
(Nashik Niphad Two leopards captured in the same cage)
संबंधित बातम्या :
कोरोना सुट्टीचा असाही सदुपयोग; शिक्षकांनी पालटले जीर्ण झालेल्या शाळेचे रुपडे
कोरोना लसींचा तुटवडा, नाशिककरांची निराशा, 2 केंद्रांवर कोवॅक्सिनचं लसीकरण, कोविशील्डचा साठा संपला