नाशिककरांना मिळणार नवी घरे; जुन्या इमारतींचा होणार पुनर्विकास, नगरविकास खाते राजी
एक अतिशय आनंदाची बातमी. आता मूळ नाशिककरांना (Nashik) चक्क नवी घरे (new houses) मिळणार आहेत. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाठी नगरविकास खात्याने मंजुरी दिल्याने सर्वसामान्य नागरिकांचे नवीन घराच स्वप्न साकारले जाणार आहे.
नाशिकः एक अतिशय आनंदाची बातमी. आता मूळ नाशिककरांना (Nashik) चक्क नवी घरे (new houses) मिळणार आहेत. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाठी नगरविकास खात्याने मंजुरी दिल्याने सर्वसामान्य नागरिकांचे नवीन घराच स्वप्न साकारले जाणार आहे. (Nashik residents to get new houses; Old buildings to be redeveloped, approval of Urban Development Department)
नाशिकमध्ये आता मुंबईच्या धर्तीवर जुन्या इमारतींचा पुनर्विकास आहे होणार. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला मंजुरी दिली असून, त्यासाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवावा, असे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकमधील जवळपास चार लाख इमारतींपैकी 30 टक्के या जुन्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. नाशिकमधील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गटनेता विलास शिंदे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचा या शिष्टमंडळामध्ये सहभाग होता. त्यांनी जुन्या घरांचा पुन्हा विकास करण्यासाठी एफएसआय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
नाशिकमध्ये 1456 जुन्या इमारती
नाशिकमध्ये सध्या तब्बल 1456 जुने वाडे, इमारती आणि घरे धोकादायक आहे. या इमारतींना यापूर्वी महापालिकेकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात जुन्या धोकादायक इमारतींचे प्रमाण जास्त आहे. नाशिक रोड विभागात 102 धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी 18 इमारती या अतिधोकादायक स्वरूपाच्या आहेत. या घरांनाही पालिकेने नोटीस बजावली आहे. त्यानंतर काही घरमालकांनी स्वतःहून इमारतींची डागडुजी करून घेतली आहे. तर काही जणांनी या इमारतींची उंची कमी केली आहे. सरकारच्या नव्या निर्णयाची लवकर अंमलबजावणी झाली, तर या घरमालकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
निवडणुकीच्या तोंडावर निर्णय
नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर नगरविकास खात्याने जुन्या इमारतींचा विकास करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. सोबतच महापालिकेला प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. सध्या महापालिकेत शिवसेना विरोधी पक्ष आहे. हे पाहता येत्या महापालिकेच्या तोंडावर शिवसेनेला या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. ( Nashik residents to get new houses; Old buildings to be redeveloped, approval of Urban Development Department)
इतर बातम्याः
भाजप विरुद्ध भाजप; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये रंगला सामना
बांधकाम मजुरांना मोफत ‘मध्यान्ह भोजन’; नाशिकमधून सुरुवात, सकस आहार मिळणार
नाशिकमध्ये वाढत्या रुग्णांची चिंता, लसीकरणाचा वेग वाढवा; पालकमंत्री भुजबळांच्या प्रशासनाला सूचना