Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…
नाशिकच्या एका शेतकऱ्याने या नागाला जीवदान दिलंय. येवला तालुक्यातील एरंडगावातील ही घटना आहे.विजय कुमार दुकळे या शेतकऱ्याच्या शेततळ्यात नाग नागिनीची जोडी आढळून आली. विजय कुमार दुकळे यांनी त्वरित सर्पमित्राला फोन केला. सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी लगेच परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेत या नाग आणि नागिनीच्या जोडीला जीवदान दिलं.
नाशिक : बऱ्याचदा आपण पाहातो की, घरात-शेतात साप किंवा नाग निघाल्यास त्याला मारलं जातं. पण नाशिकच्या (Nashik) एका शेतकऱ्याने (Farmer) या नागाला जीवदान दिलंय. येवला तालुक्यातील एरंडगावातील ही घटना आहे.विजयकुमार दुकळे या शेतकऱ्याच्या शेततळ्यात नाग नागिनीची जोडी आढळून आली. विजय कुमार दुकळे (Vijaykumar Dukale) यांनी त्वरित सर्पमित्राला फोन केला. सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी लगेच परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेत या नाग आणि नागिनीच्या जोडीला जीवदान दिलं. त्यांना जंगलात सोडून देण्यात आलं.
नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान
नाशिकच्या एका शेतकऱ्याने या नागाला जीवदान दिलंय. येवला तालुक्यातील एरंडगावातील ही घटना आहे.विजय कुमार दुकळे या शेतकऱ्याच्या शेततळ्यात नाग नागिनीची जोडी आढळून आली. विजय कुमार दुकळे यांनी त्वरित सर्पमित्राला फोन केला. सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी लगेच परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेत या नाग आणि नागिनीच्या जोडीला जीवदान दिलं. त्यांना जंगलात सोडून देण्यात आलं.
काही दिवसांआधी वसई, विरारसह मुंबईच्या विविध भागांतील समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या निकामी जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ सापाना रेस्क्यू करून, त्यांना जीवदान दिल्याचं समोर आलं होतं. मच्छिमारांच्या जाळयात साप अडकल्याने अनेक सापांच्या शरीराला जखमा झाल्या होत्या. त्या जखमांवर औषधोपचार करुन त्यांना जीवदान देण्यात आले. वेगवेगळ्या जातीचे साप जाळ्यात अडकले होते. त्यांना त्यातून बाहेर पडता आले नाही मात्र स्वतः बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असताना जाळ्यामुळे त्यांच्या शरीराला जखमा झाल्या होत्या. जखमी सापांवर उपचार करत असताना त्यांना अलगदरणे जाळ्यात बाहेर काढून हळूवारपणे त्यांच्यावर उपचार केले गेले. अम्मा केअर फाउंडेशन आणि एनिमल्स वेल्फेअरच्या मदतीने या प्राण्यांना जीवदान देण्यात आले.
संबंधित बातम्या