“फणसाच्या अंगी काटे,आत अमृताचे साठे”; अजित पवार यांचे मोठेपण या नेत्यानं सांगितलं…

अजित पवार यांच्या स्वभावाविषयी बोलताना नरहरी झिरवळ यांनी सांगितले की,'फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे' अशी उपमा देत अजित पवार यांचे झिरवळ यांनी त्यांचे कौतुक केले.

फणसाच्या अंगी काटे,आत अमृताचे साठे; अजित पवार यांचे मोठेपण या नेत्यानं सांगितलं...
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 8:27 PM

सुरगाणा/नाशिक : सध्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लांब असल्या तरी आतापासूनच भावी मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाच्या चर्चेना आता उधान आले आहे.

आमदार नरहरी झिरवळ यांनी अजित पवार यांच्या गौरवोद्गगार काढत अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांनी अनेक गुणही त्यांनी सांगितले.

राज्यभरातून येणाऱ्या लोकांना अजित पवार यांच्याबद्दल काय वाटतं तेही नरहरी झिरवळ यांनी बोलून दाखवले. यावेळी ते म्हणाले की, बरेच लोकं म्हणतात की, दादा गरम आहेत मात्र दादा कामाच्या बाबतीत आग्रही असतात त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे अनेकांना त्यांचा धाक वाटतो असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कामाविषयी सांगतान नरहरी झिरवळ म्हणाले की, कामाच्या पातळीवर अजित पवार म्हणजे एक प्रकारची शिस्त आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना अजितदादां यांच्याहीपेक्षाआपण स्ट्रिक्ट झाले पाहिजे असं मतही त्यांना यावेळी व्यक्त केले.

अजित पवार यांच्या स्वभावाविषयी बोलताना नरहरी झिरवळ यांनी सांगितले की,’फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’ अशी उपमा देत अजित पवार यांचे झिरवळ यांनी त्यांचे कौतुक केले.

त्यांच्या कामामुळेच आता अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असंही त्यांना यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याबाबत बोलताना सांगितले की, मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही, तर तेच माझ्याकडे येतात आणि त्यांनाच माझ्याकडे यावं लागतं असा टोलाही त्यांना यावेळी लगावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.