शरद पवारांची नाशिकमध्ये सर्वात मोठी खेळी, भुजबळांच्या पराभवासाठी अमृता पवार यांना मैदानात उतरवणार?

शरद पवार मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शरद पवार छगन भुजबळ यांच्या पराभवासाठी भाजप नेत्या अमृता पवार यांचा पक्षप्रवेश करुन त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

शरद पवारांची नाशिकमध्ये सर्वात मोठी खेळी, भुजबळांच्या पराभवासाठी अमृता पवार यांना मैदानात उतरवणार?
छगन भुजबळ आणि शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 8:13 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याची परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही घडू शकतं हे वास्तव आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तर 10 पैकी 8 उमेदवार जिंकून आले. साताऱ्याचा उमेदवार फार कमी फरकाने पराभवी झाला. त्यामुळे या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आखलेली रणनीती खरी ठरली हे स्पष्ट झालं. आता शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. यातील पहिला टार्गेट हा कदाचित मंत्री छगन भुजबळ हे आहेत, अशी चर्चा आहे. कारण छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात शरद पवार भाजपच्या अमृता पवार यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊ शकतात. तसेच त्यांना येवला विधानसभा मतदारसंघाचं तिकीटही देऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चा रंगण्यामागील घटना आज नाशिकमध्ये उघडपणे बघायला मिळाली आहे.

येवल्यात भाजप नेत्या अमृता पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचं स्वागत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमृता पवार या येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे अमृता पवार शरद पवार गटात प्रवेश करतात का, आणि मंत्री छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार असा सामना आगामी निवडणुकीत रंगणार का? याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आहे.

अमृता पवार कोण आहेत?

अमृता पवार या माजी खासदार वसंत पवार यांच्या कन्या आहेत. त्यांना येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. अमृता पवार या भाजपच्या नेत्या आहेत. पण त्यांना आता शरद पवार गटाकडून विधानसभेचं तिकीट हवं असल्याची चर्चा आहे. सध्या मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे आमदार आहेत. याच मतदारसंघात अमृता पवार या देखील निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. असं असताना त्यांनी आज अचानक शरद पवार यांचं स्वागत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

अमृता पवार काय म्हणाल्या?

“मला भाजप पक्षाने येवल्यात विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती. त्यामुळे मी येवला विधानसभा पिंजून काढलेलं आहे. पण शेवटी राजकारण आहे. काय होईल ते सांगता येत नाही”, अशी प्रतिक्रिया अमृता पवार यांनी दिली आहे. अमृता पवार यांनी शरद पवार यांचं स्वागत केल्यामुळे येवल्यात आगामी काळात काय-काय राजकीय घडामोडी घडतात, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.