नाशिक : नाशिक महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणूका तोंडावर आल्यायं. इतकेच नाही तर वार्ड हे आरक्षित करण्यात आले आहेत. वार्ड आरक्षित झाले असले तरी नव्या प्रभागात नव्या जिद्दीने कामाला लागण्याची तयारी ही इच्छूकांनी दर्शवली असून आता वार्डानिहाय नियोजन करण्यास प्रस्थापितांसोबत इच्छुकांनी तयार केलीये. मात्र, आरक्षण जाहिर झाल्यानंतर अनेकांना आपले वाॅर्ड सोडून इतर वाॅर्डामध्ये आपले नशीब आजमावे लागणार आहे. नाशिकची एकूण लोकसंख्या (Population) 14,86,053 एवढी आहे. महापालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. त्यापैकी 43 प्रभाग हे तीन सदस्यीय असून एक प्रभाग चार सदस्यीय आहे. दरवेळीच नाशिक (Nashik) महापालिकेच्या निवडणूकीची जोरदार चर्चा होते. यंदा प्रभाग क्रमांक 9 मध्ये काटे की टक्कर होणार असून प्रभाग 9 मध्ये नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
मनसे |
प्रभाग क्रमांक 9 मध्ये एकून लोकसंख्या ही 35999 आहे. राजीव गांधी इमारत संकुल, सुमती कॉलनी, पंडीत कॉलनी, गोदावरी नदी उजवा तटावरील चव्हाण कॉलनी (परीचीबाग) गोदापार्क, गेटपासून गोदावरी नदीच्या उजव्या तिरानेपुर्वेकडे दक्षिणेकडील परिसर, हनुमानघाट, घारपुरेघाट ते राजीव गांधी भवन, जोशीवाडा, अशोकस्तंभ, शनिगल्ली, तुळजाभवानी मंदिर, टिळकवाडी पोलिस हेडक्वार्टरपर्यंत आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
मनसे |
दक्षिण जंबकनाक्यावरील आर. के पश्चिम त्रंबकरोडवरील मायकोसर्कल पासुन त्रंबक रोडने शरणपूर पोलिस चौकी सिग्नल पावेतो सिग्नल पासून शरणपूर रोडने हॉटेल एमराल पार्क समोरुन जुने पोलिस आयुक्त कार्यालयासमोरुन चर्चच्या भिंतीने कॅनडा कॉर्नर सिग्नल पावेतो कॅनडाकॉर्नर पासून तेथुन उत्तरेकडे कॉलेजरोड पर्यंत प्रभाग 9 आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
मनसे |
नाशिक महापालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. त्यापैकी 43 प्रभाग हे तीन सदस्यीय असून एक प्रभाग चार सदस्यीय आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. यंदा महाविकास आघाडी सरकार भाजपची पालिकेवरील सत्ता हिरावून घेणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. प्रभाग क्रमांक 9 गट अ मधून 2017 ला धिवरे रविंद्र गोविंद हे विजयी झाले होते.
प्रभाग क्रमांक 9 गट ब मधून 2017 ला कांडेकर हेमलता दादा या विजयी झाल्या होत्या. क्रमांक 9 गट क मधून 2017 ला भालेराव वर्षा अनिल या विजयी झाल्या होत्या. क्रमांक 9 गट ड मधून 2017 ला पाटील दिनकर धर्मा हे विजयी झाले होते. गेल्या वर्षी प्रभागामध्ये चार नगरसेवक असायचे मात्र, यंदा 43 प्रभाग तीन सदस्यांनुसार असणार आहेत.