Malegaon : मालेगावातल्या शासकीय कार्यालयामध्ये नो हेल्मेट नो एन्ट्री; सोमवारपासून धडाकेबाज कारवाई

मालेगावमधल्या (Malegaon) शासकीय कार्यालयामध्ये दुचाकीस्वारांना विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय आगामी काळात मालेगाव शहरातही दुचाकी चालकांना हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Malegaon : मालेगावातल्या शासकीय कार्यालयामध्ये नो हेल्मेट नो एन्ट्री; सोमवारपासून धडाकेबाज कारवाई
मालेगावमध्ये पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले.
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:14 PM

मालेगावः नाशिकमध्ये (Nashik) पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राबवलेल्या आणि प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या हेल्मेट सक्तीनंतर आता तशीच मोहीम मालेगावमध्ये सुरू होतेय. त्यामुळे सोमवारपासून मालेगावमधल्या (Malegaon) शासकीय कार्यालयामध्ये दुचाकीस्वारांना विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय आगामी काळात मालेगाव शहरातही दुचाकी चालकांना हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिकमध्ये ऑगस्ट 2021 मध्ये नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी तत्कालीन पोलीस (Police) आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर दुचाकीस्वारांचे समुपदेशन, नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट प्रवेश दिला नाही. त्यानंतर पेट्रोलपंप चालकांना विनाहेल्मेट दुचाकीधारांना पेट्रोल न देण्याचा सूचना दिल्या. अगदी दीपक पांडेय यांची बदली होईपर्यंत याप्रकरणी पेट्रोलपंप चालकांना नोटीस देण्यात आली. मात्र, नाशिकमध्ये या मोहिमेचा फज्जा उडालेला दिसला.

अन्यथा दंड ठोठावणार

नाशिकनंतर आता मालेगावमध्ये सुरू होणाऱ्या हेल्मेटसक्तीला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावे लागेल. वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे असून रिक्षा, कार तसेच अन्य सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांना नकीच आळा बसेल. त्यामुळेच येत्या सोमवारपासून शासकीय कार्यालयामध्ये विनाहेल्मेट प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच दुचाकीवरून येणाऱ्यांना विनाहेम्लेट येऊ नये. अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कार्यालयासमोर लावले फलक

मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. मालेगावातील अपर जिल्हाधिकारी कार्यालय, मालेगाव कोर्ट, प्रांत, तहसीलदार कार्यालयासह सर्वच कार्यालयात येणाऱ्या नागरिक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही मालेगाव परिवहन विभागाने सूचना दिल्या असून, सोमवारपासून विनाहेल्मेट कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई करायचा इशारा दिला आहे. या अभियानाची पूर्व तयारी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी शहरातील शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रबोधनात्मक फलकही लावले आहेत. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.