नरेंद्र मोदी यांची नाशकात सभा, काँग्रेसवर प्रचंड प्रहार, नाशिकच्या जनतेला उद्देशून काय म्हणाले?

"काँग्रेस आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने राजकारणात स्वत:ला वाचवण्यासाठी स्वत:चं सर्वात मोठं हत्यार उपसलं आहे. ते हत्यार म्हणजे एससी, एसटी आणि ओबीसींची एकात्मता तोडा आणि राज्य हिसकवा", असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

नरेंद्र मोदी यांची नाशकात सभा, काँग्रेसवर प्रचंड प्रहार, नाशिकच्या जनतेला उद्देशून काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 3:51 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर प्रचंड टीका केली. यावेळी त्यांनी नाशिककरांना देखील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलं. “जेव्हा नीती स्पष्ट असते, नियत स्वच्छ असते तेव्हा त्याचे चांगले परिणाम दिसतात. नाशिकचे माझे बंधू-बघिणी हे चांगले परिणाम पाहत आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भार भारताची ताकद बनत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पर्वा आहे, ना कोर्टाची, ना देशाच्या भावनेची पर्वा आहे. ते फक्त देखाव्यासाठी खिशात खाली पानांचे संविधान घेऊन फिरतात”, असा टोला मोदींनी लगावला.

“काल तुम्ही पाहिलं असेल. पोलखोल झाली. जेव्हा संविधानाच्या सन्माचा विषय येतो तेव्हा ते उलट पळतात. हे काँग्रेसवाले असे आहेत की, त्यांनी 75 वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला लागू होऊ दिलं नाही. 75 वर्षांपर्यंत देशात एक संविधान नव्हतं. जम्मू-काश्मीरचं संविधान वेगळं होतं. ते बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नव्हतं. ते पाप काँग्रेसचं होतं. काँग्रेसने कलम 370 सारखी भिंत उभी केली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तिथे जाऊच शकत नव्हतं”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘काँग्रेसवाल्यांचे कान फुटतील इतक्या जोराने सांगा…’

“भाजपप्रणित एनडीएने कलम 370 हटवलं आणि एक देश, एक संविधान लागू केलं. माझी बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. जेव्हा भारताचं संविधान जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण देशात आनंद साजरा केला जात होतो. मी माझ्या नाशिकच्या लोकांना विचारु इच्छुतो, काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्याने तुम्हाला आनंद झाला की नाही? या काँग्रेसवाल्यांचे कान फुटतील इतक्या जोराने सांगा तुम्हाला आनंद झाला की नाही?”, असं नाशिककरांना उद्देशून नरेंद्र मोदी म्हणाले.

‘त्यांच्या पोटात उंदिर धावायला लागले’

“आपल्याला आनंद झाला पण काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात उंदिर धावायला लागले. त्यांना दुखायला लागलं. दोन-तीन दिवसाआधी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्यासाठी हंगामा केला. या लोकांना पुन्हा बाबासाहेबांचं संविधान जम्मू-काश्मीरमधून काढायचं आहे. संविधानाच्या विरोधात दलित, मागास, आदिवासींच्या विरोधात काँग्रेस आहे, तितकेच आघाडीचे त्यांचे सहकारी देखील आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खोटे बोलण्याची दुकान’

“निवडणुकीच्या वेळी पक्ष आपल्या कामकाजांचा हिशोब देवून जनतेत जाते. भाजप आणि महायुतीदेखील लगातार आपल्या कामांचा हिशोब देत आहे. पण भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडे एकच पद्धत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खोटे बोलण्याची दुकान आहे. काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी महाराष्ट्रात हे दुकान सुरु केलं आहे. काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचलमध्येदेखील असेच खोटे दुकान सुरु केले होते. पण परिणाम काय झाले, निवडणुका संपल्या आणि दुकानेच शटर लागले”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

‘खर्चासाठी जनतेचे टॅक्स वाढवले’

“दिलेली आश्वासने पूर्ण करणं तर दूर काँग्रेसशासित राज्यात सरकार चलवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. खर्चासाठी जनतेचे टॅक्स वाढवले जात आहेत. जनतेकडून वसुली होत आहे. जनतेला देखील यांचं खरं रुप माहिती समजली आहे. महाराष्ट्राची जनता हे जाणून आहे. एकीकडे महायुतीचं घोषणापत्र दुसरीकडे आघाडीचं घोटाळापत्र. कारण जिथे काँग्रेस आणि त्यांचे सहकारी असतील तिथे घोटाळा होणार म्हणजे होणार”, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

‘काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी सर्वात मोठं हत्यार उपसलं’

“हे लोक अशा योजनांची घोषणा करतात ज्याच्यात जास्तीत जास्त घोटाळा होईल. आपण या लोकांना हे पाप करु देणार का? ही फसवणूक महाराष्ट्राच्या जनतेला चालेल का? संपूर्ण देशाने काँग्रेसला घरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेस आता राष्ट्रीय राहिलेली नाही. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा अनेक राज्यांत काँग्रेस दुसऱ्या पक्षांसोबत निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने राजकारणात स्वत:ला वाचवण्यासाठी स्वत:चं सर्वात मोठं हत्यार उपसलं आहे. ते हत्यार म्हणजे एससी, एसटी आणि ओबीसींची एकात्मता तोडा आणि राज्य हिसकवा”, असादेखील आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.