AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपण विषयुक्त दूध तर पित नाही ना?, ऑक्सिटोसीनचा होतोय सर्रास वापर

औषधाच्या बाटल्याचा वापर जनावरांचे दूध वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

आपण विषयुक्त दूध तर पित नाही ना?, ऑक्सिटोसीनचा होतोय सर्रास वापर
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 4:58 PM

मनोहर शेवाळे, प्रतिनिधी, मालेगाव : तुम्ही दूध पित असाल तर पाहून प्या. कारण गाय, म्हशींचे दूध वाढावे, यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर केला जातो. यामुळे दुधात विषयुक्त पदार्थ जातात. हे मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. दूध पिताना ते कुठून येते. याची शास्वती करून नंतर प्या. कारण आजकाल दुधातही भेसळ व्हायला लागली आहे. शहरातील हिरापुरा भागात पोलिसांनी छापा टाकत मोहम्मद इकबाल या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 हजार ऑक्सिटोसीन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. मालेगाव परिसरात सर्रास या जीवघेण्या औषधाचा वापर केला जातो. पोलिसांच्या दुसऱ्या कारवाईवरून ही बाब समोर आली आहे.

काही गोठ्यांवर नजर ठेवत औषधाच्या बाटल्याचा वापर जनावरांचे दूध वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

औषधाचा अवैध साठा

या औषधाचा वापर अन्य वैद्यकीय कामासाठीदेखील होत असतो. मात्र जनावरांचे दूध वाढावे, यासाठी या औषधांचा सर्रास वापर होतो. त्याचा अवैधरित्या साठा करून ते मालेगावमध्ये वितरित होत असल्याचं समोर आल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.

ऑक्सिटोसीन औषधाच्या बाटल्या विक्री

शहरातील हिरापुरा भागातील मोकळ्या मैदानाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या खोलीवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात मोहम्मद अन्वर मोहम्मद इकबाल हा विनारंगाच्या ऑक्सिटोसीन औषधाच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला.

1000 प्लास्टिकच्या बाटल्या

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून 60 हजार च्या बाटल्या जप्त केल्या. प्रत्येकी 100 ml च्या पाच खोक्यांमध्ये ठेवलेल्या 1000 प्लास्टिकच्या बाटल्या होत्या. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक प्रशांत विठ्ठल ब्राह्मणकर यांनी संशयितांविरुद्ध किल्ला पोलिसांत तक्रार दिली. या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे विषयुक्त दूध आपण पित असू तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे दूध पिताना सावधान राहणे गरजेचे आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.