चंचल वारा, या जलधारा…नाशिकमध्ये ऊन-पावसाचा खेळ…पुढचे दोन दिवस सोहळा!
नाशिकमध्ये (Nashik) मंगळवारी (21 सप्टेंबर) सकाळ पासून ऊन-पावसाचा (Rain) खेळ सुरू आहे. पुढचे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रासाठी (North Maharashtra) हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस सोहळा रंगणार आहे.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) मंगळवारी (21 सप्टेंबर) सकाळ पासून ऊन-पावसाचा (Rain) खेळ सुरू आहे. पुढचे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रासाठी (North Maharashtra) हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस सोहळा रंगणार आहे. (Presence of rain in Nashik, Chance of rain in North Maharashtra, Meteorological Department forecast)
नाशिकमध्ये काल दिवसभर अनेकदा भुरभुर पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या वेळेस मात्र आकाश निरभ्र होते. आज सकाळीही आकाशात ढग होते. साधरणतः पावणेदहाच्या सुमारास रिमझम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कधी क्षणात ऊन पडते आणि कधी क्षणात पाऊस येतो, असे चित्र आहे. दरम्यान, हवामान विभागाने 21 आणि 22 सप्टेंबरदरम्यान राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. सध्या पूर्व राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडील जैसलमेर ते पूर्वेकडील डाल्टनगंजपर्यंत सक्रिय असून, पश्चिम बंगालमध्ये गंगेचा मैदान परिसर आणि तामिळनाडू किनाऱ्यावर चक्रीय चक्रावात आहे. या सोबतच दक्षिण कर्नाटक ते कामोरीन असाही कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
धरणे काठोकाठ
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.
जळगावकरही खूश
जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, बोरी ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचा साठा हा 60.84 वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाणीचिंता मिटली आहे.
मुंबईवरही कृपाछत्र
मुंबईकला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला. मंगळवारी धरणाच्या तीन सांडव्याचे एक गेट उचलून 1865 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोबतच कालव्याद्वारे 450 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे. (Presence of rain in Nashik, Chance of rain in North Maharashtra, Meteorological Department forecast)