नाशिकमध्ये पावसाची हजेरी; जाणून घ्या दोन दिवसांचा अंदाज

नाशिकमध्ये सोमवारी (20 सप्टेंबर) दुपारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अशोकामार्ग, बोधले स्टॉप, इंदिरानगरसह शहराच्या इतर भागातील वातावरण बदलून गेले.

नाशिकमध्ये पावसाची हजेरी; जाणून घ्या दोन दिवसांचा अंदाज
नाशिकमध्ये पावसाची हजेरी.
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 2:53 PM

नाशिकः नाशिकमध्ये सोमवारी (20 सप्टेंबर) दुपारी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अशोकामार्ग, बोधले स्टॉप, इंदिरानगरसह शहराच्या इतर भागातील वातावरण बदलून गेले. (Presence of rain in Nashik, Chance of rain in North Maharashtra, Meteorological Department forecast)

गेले दोन दिवस नाशिकला पावसाने विश्रांती घेतली होती. बाप्पांच्या विसर्जनानंतर सोमवारी दुपारी पुन्हा एकदा हलक्या पावसाने हजेरी लावली. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी (20 सप्टेंबर) उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ, विजांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवार (21 सप्टेंबर) आणि बुधवारी (22 सप्टेंबर) विभागातील अनेक ठिकाणी गडगडाटी वादळ, वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात धुके असण्याचीही शक्यता आहे.

धरण परिसरात जमावबंदी

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत.

वाघूरचा साठा वाढला

जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, बोरी ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचा साठा हा 60.84 वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाणीचिंता मिटली आहे.

अप्पर वैतरणा भरले

मुंबईकला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. मंगळवारी (14 सप्टेंबर) हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला. मंगळवारी धरणाच्या तीन सांडव्याचे एक गेट उचलून 1865 क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सोबतच कालव्याद्वारे 450 क्यूसेक्सने विसर्ग सुरू आहे. (Presence of rain in Nashik, Chance of rain in North Maharashtra, Meteorological Department forecast)

इतर बातम्याः

नाशिक पुन्हा गॅसवर; कोरोना रुग्णांत वाढ, हजाराचा टप्पा ओलांडला

नाशिकमध्ये बाप्पांच्या विसर्जनाला गालबोट; मूर्ती संकलन करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एक ठार

नाशिकः प्रदूषण मुक्ततेची दीक्षा देऊन बाप्पा गेले गावाला; रुखरुख लागे जीवाला!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.