नाशिकमध्ये कोरोनाचा हैदोस, नगरसेविकेकडून संपर्क कार्यालयाचं रुपांतर थेट कोरोना चाचणी केंद्रात

नाशिकमध्ये कोरोनाने अक्षरशः हैदोस घातलेला असताना आणि सगळ्या शासकीय यंत्रणा तोकड्या पडत असताना नाशिकचं माने दाम्पत्य लोकांसाठी अक्षरशः देवदूत सिद्ध होत आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा हैदोस, नगरसेविकेकडून संपर्क कार्यालयाचं रुपांतर थेट कोरोना चाचणी केंद्रात
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 3:55 AM

नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाने अक्षरशः हैदोस घातलेला असताना आणि सगळ्या शासकीय यंत्रणा तोकड्या पडत असताना नाशिकचं माने दाम्पत्य लोकांसाठी अक्षरशः देवदूत सिद्ध होत आहे. कोरोनाच्या धाकाने जिथे शहरातील अनेक लोकप्रतिनिधी गायब झाले आहेत तिथं नगरसेविका प्रियांका माने आपल्या पतीसह अहोरात्र लोकांच्या मदतीसाठी उभे ठाकले आहेत (Priyanka Mane corporator from Nashik convert party office in to corona testing center).

संपर्क कार्यालयाला तपासणी केंद्र बनवलं

देवदूत झालेल्या माने दाम्पत्याने नाशिकमधील आपल्या संपर्क कार्यालयाला तपासणी केंद्र बनवलंय. दोघे जण हजारो लोकांच्या चाचण्या करतायेत. अनेकांना मोफत उपचार देताहेत. जेव्हा इतर नगरसेवक गायब झालेत. तेव्हा माने दाम्पत्य मैदानात आहे. त्यामुळेच नाशिककरांकडून लोकप्रतिनिधी असावा तर असा असे उद्गार काढले जात आहेत.

गेल्या वर्षीपासून दोघे नवरा बायको लोकांना मदतीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात

नाशिकच्या पंचवटी परिसरातील हे तरुण दाम्पत्य म्हणजे नगरसेवक प्रियांका माने आणि आणि त्यांचे पती धनंजय माने. ते सध्या नाशिकमध्ये चांगलेच चर्चेत आले आहेत. लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे दाम्पत्य. गेल्या वर्षी कोरोनाची तीव्रता वाढायला लागल्यापासून हे दोघेही नवरा बायको लोकांना मदत करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत. आपल्या संपर्क कार्यालयालाच यांनी रुग्णालयाचं रूप दिलंय आणि हजारो लोकांना आज मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणण्याचं काम माने दाम्पत्य करताहेत.

नाशिकमध्ये सध्या आभाळ फाटल्यागत परिस्थिती

नाशिकमध्ये सध्या आभाळ फाटल्यागत परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत प्रशासनासोबतच प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचा वाटा उचलावा असं आवाहन हे दाम्पत्य करत आहे. नाशिकमध्ये कोरोनाने भीषण रूप धारण केलंय. अशा परिस्थितीत फक्त प्रशासनाकडे बोट न दाखवता स्वतः मैदानात उतरून लोकसेवा करणारे लोकप्रतिनिधी विरळच. म्हणूनच रुग्ण सेवेच्या या कामामुळे माने दाम्पत्य देखील त्यापैकीच एक म्हणावे लागतील.

हजारो लोकांच्या मदतीला रात्री अपरात्री धावून जाणारे माने दाम्पत्य

शहरात काही मदत केली की सोशल मीडियावर त्याचा गवगवा करणाऱ्या तथाकथित नेत्यांना माने दाम्पत्याने आपल्या कामातूनच चपराक लगावली आहे. हजारो लोकांच्या मदतीला रात्री अपरात्री धावून जाणारे माने दाम्पत्य स्वतःच्या लहान मुलांना देखील अनेक महिन्यांपासून भेटलेले नाहीत. फक्त स्वतःच्या नावाला नगरसेवक म्हणणाऱ्या नेत्यांनी माने दाम्पत्याचा आदर्श घेण्याची आता आवश्यकता असल्याचं मत नाशिककर व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

Nashik Oxygen Tank Leak | नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, 22 जणांचा गुदमरुन मृत्यू, नेमकं काय घडलं?

तीन दिवसानंतरही अधिकाऱ्याने रेमडेसिवीर दिल्या नाही; संतप्त भुजबळांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव

महाराष्ट्राला मोठा दिलासा, ऑक्सिजन एक्स्प्रेस कळबोंलीला पोहोचली; मुंबई पुण्याला ऑक्सिजन मिळणार?

व्हिडीओ पाहा :

Priyanka Mane corporator from Nashik convert party office in to corona testing center

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.