अजूनही बरसात आहे, नाशिकमध्ये पुन्हा हजेरी!

नाशिकमध्ये शुक्रवारी (1 ऑक्टोबर) दुपारपासून पावसाने हजेरी लावली. अडीचपर्यंत असलेले कडक ऊन क्षणात नाहीसे होऊन आभाळात ढगांनी गर्दी केली. उशिरापर्यंत पावसाची बरसात सुरू होती.

अजूनही बरसात आहे, नाशिकमध्ये पुन्हा हजेरी!
पावसाची पुन्हा हजेरी.
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 5:17 PM

नाशिकः नाशिकमध्ये शुक्रवारी (1 ऑक्टोबर) दुपारपासून पावसाने हजेरी लावली. अडीचपर्यंत असलेले कडक ऊन क्षणात नाहीसे होऊन आभाळात ढगांनी गर्दी केली. उशिरापर्यंत ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.

सप्टेंबर महिन्यापासून नाशिकमध्ये पाऊस मुक्कामी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंब भरलीयत. गोदामायला चार ते पाच वेळेस पूर आला. आता पाऊस विश्रांती घेईल, अशी चिन्हे होती. शुक्रवारी तर सकाळपासून कडक ऊन पडले. त्यामुळे अनेकांनी गच्चीवर टाकलेले ओले कपडे तासाभरात वाळून निघाले. साधरणतः दुपारी अडीचपर्यंत ही परिस्थिती कायम होती. मात्र, त्यानंतर क्षणात जादूची कांडी फिरल्यासारखे वातावरण बदलले. आकाळात ढगांनी गर्दी केली. अन् पावसाला सुरुवात झाली. उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता. दरम्यान, नाशिकमध्ये शुक्रवारी हवेतल्या प्रदूषणाने उच्च पातळी गाठली. जवळपास 51 टक्क्यांपर्यंत त्याची नोंद झाली. संवदेनशील लोकांसाठी घराबाहेर फिरण्यासाठी हे वातावरण खराब होते.

14 धरणे काठोकाठ भरली

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार हजेरीमुळे नाशिकमधली 14 धरणे काठोकाठ भरलीयत, तर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार गेलाय. जिल्ह्यात पावासने लावलेल्या दमदार हजेरीमुळे अनेक ठिकाणी हाहाकार उडालाय. मनमाड, नांदगाव या ठिकाणी दोनदोनदा पूर आला. नाशिकमध्ये गोदामाय चारदा ओसडंली. गंगापूर धरण समूह भरलाय. गंगापूर धरणातून सतत विसर्ग सुरू होता. तूर्तास तरी पावसाच्या या तडाखेबंद बॅटींगनं जिल्ह्याची तहान भागलीय. जिल्ह्यातल्या चौदा धरणांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर गेलाय. त्यात गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, माणिकपुंज या धरणांचा समावेशय. तीसगाव, चणकापूर, पुनद ही धरणेही भरण्याच्या मार्गावरयत.

आतापर्यंत 15521.7 मिमी बरसला

नाशिक जिल्ह्यातल्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही 15004.69 मिमी आहे. त्यात बुधवारी झालेल्या नोंदीनुसार ही सरासरी आता 15521.7 मिमीवर पोहचलीय. गुलाबी चक्रीवादळानं जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं अनेक ठिकाणी घरे कोसळली. शेतीचं मोठं नुकसान झालं. सध्या पावसानं पाठ फिरवली तरी हरकत नाही. कारण उरलं-सुरलं खरीप तर पदरात पडेल, अशी आशा शेतकरी करतोय. (Rain again in Nashik, cloudy weather in the afternoon)

इतर बातम्याः

सोन्याची आभाळाकडे वाटचाल; नाशिक सराफात पुन्हा उसळी!

आयपीएल बुकीची ‘माया’ पडली महागात; 30 लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिकमध्ये बेड्या

आई राजा उदो उदो: नवरात्रोत्सवात वणीचे सप्तश्रृंगी मंदिर 24 तास सुरू; यात्रा रद्द, दर्शनासाठी कडक नियम

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.