निवडणुकीआधी राज ठाकरेंचा षटकार; नाशिक मनसेमध्ये मोठे फेरबदल!
अखेर महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिक शहर आणि जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत.
नाशिकः अखेर महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिक शहर आणि जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. हॉटेल एसएके सोलीटेयर येथे झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात गुरुवारी (23 सप्टेंबर) ही यादी जाहीर करण्यात आली. त्यात नूतन पदाधिकाऱ्यांसह 122 नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. (Raj Thackeray made major changes in the party organization in Nashik today)
फेरबदलात नाशिक शहर अध्यक्षपदी दिलीप दातीर यांची वर्णी लागली आहे, तर अंकुश पवार यांची नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर बढती झाली आहे. सोबतच अॅड रतनकुमार ईचम यांनाही जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. सचिन भोसले यांची शहर समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नियुक्तीत नाशिक शहरातील सहाही विभाग अध्यक्षांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यात नाशिक मध्य विधानसभा विभाग अध्यक्षपदी नितीन साळवे आणि सत्यम खंडाळे, नाशिक पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्षपदी रामदास दातीर आणि योगेश लभडे, तर नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्षपदी भाऊसाहेब निमसे आणि विक्रम कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कामाला लागा
आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. यापूर्वी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि पक्षांच्या इतर नेत्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अपेक्षेप्रमाणे शाखा अध्यक्षांच्या नियुक्तीवर मान्यतेचा ठसा उमटिवला आहे. मनसेमध्ये शाखा अध्यक्ष हे सर्वात महत्त्वाचे पद असून, गेल्या महिन्यापासून या निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. या शाखा अध्यक्षांना आता आगामी महापालिका निवडणुका पाहता जोरदार कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
फेब्रुवारीत निवडणुका
राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षांत पुन्हा एकदा निवडणुकाचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray made major changes in the party organization in Nashik today)
इतर बातम्याः
लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल
कार्यकर्ते म्हणाले ‘आमचे सोडून सगळ्यांचे होर्डिंग्स लागतात’, मग राज ठाकरेंचं उत्तर काय?