Raj Thackeray : राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली, रामदास आठवले यांनी उडवली खिल्ली; महायुतीत घेण्यास कडाडून विरोध

Ramdas Athawale Attack on Raj Thackeray : रामदास आठवले यांना महायुती सरकारमध्ये मंत्री पदाची आशा आहे. त्यांनी मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करण्याची मागणी केली आहे. संविधान कुणालाच बदलता येणार नाही, असे ते म्हणाले. तर याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला हाणला.

Raj Thackeray :  राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली, रामदास आठवले यांनी उडवली खिल्ली; महायुतीत घेण्यास कडाडून विरोध
रामदास आठवले, राज ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 2:14 PM

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिक दौऱ्यावर असताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. महायुती सरकारमध्ये मंत्री पदाची आशा आहे. त्यांनी मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करण्याची मागणी केली आहे. संविधान कुणालाच बदलता येणार नाही, असे ते म्हणाले. तर याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला हाणला. तर महाविकास आघाडीला सुद्धा त्यांनी चिमटा काढला. काय म्हणाले आठवले?

दोन मंत्री पदाची मागणी

विधानसभा निवडणूक रणधुमाळी संपल्यावर नाशिक दौऱ्यावर आलो आहे. लोकसभेला नुकसान झाले विधानसभेला यश आले, असे रामदास आठवले म्हणाले. अरक्षण जाणार असा प्रचार करणाऱ्यांना मतदारांनी उत्तर दिले आहे. लाडकी बहीण, महिलांनी मतदान केले. संविधान हे राजकारण पलीकडे आहे. संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही. मुख्यमंत्री पदाची त्यांच्यात महाविकास आघाडीत रेस होती. आमच्या तिन्ही नेत्यांनी अगोरदच सांगीतले होते की आम्ही रेस मध्ये नाही. नाशिक मध्ये सर्वात मोठी धम्म परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्रिमंडळचा विस्तार लवकर करावा अशी मागणी करत त्यांच्या पक्षाला दोन मंत्रीपद मिळणार असल्याचा दावा केला.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीने पराभव मान्य करावा

लोकसभेला महायुतीला अपयश आले तेव्हा, आम्ही ईव्हीएम खराब असे म्हणालो का? असा प्रश्न त्यांनी केला. महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये असे ते म्हणाले. ईव्हीएम मशीन तर याच लोकांनी आणली. आता पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या की नाही हे निवडणूक आयोग ठरवेल असे ते म्हणाले. महाविकास आघाडीने आता पराभव मान्य करावा असा चिमटा त्यांनी काढला.

राज ठाकरे यांच्यावर टीका

रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली त्यांना वाटायचे माझ्या शिवाय सत्ता येणार नाही त्यांचे स्वप्न भंग झाले. राज ठाकरे त्यांना महायुतीत घेण्यात फायदा नाही मी असताना त्यांची काय गरज आहे, असा खोचक टोला आठवले यांनी लगावला. राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन फायदा नाही. राज ठाकरेंची मी असताना महायुतीला गरज नाही. राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे असा चिमटा त्यांनी राज ठाकरे यांना काढला.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.