अमर, अकबर, अँथनीचे सरकार पायात पाय अडकून पडेल, दानवेंचा महाविकास आघाडीला खोचक टोला

आम्हाला राष्ट्रपती राजवट आणण्याची अजिबात इच्छा नाही. हे अमर,अकबर,अँथनीचे सरकार आहे. पायात पाय अडकून पडतील, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

अमर, अकबर, अँथनीचे सरकार पायात पाय अडकून पडेल, दानवेंचा महाविकास आघाडीला खोचक टोला
सरकार पायत पाय अडकून पडेल-दानवेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 11:36 PM

नाशिक : गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पडण्याचे मुहूर्त भाजपकडून (Bjp) सांगण्यात येत आहेत. आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनी पुन्हा यावर भाष्य केलं आहे. मलिकांवर झालेली कारवाई सूडबुद्धीने झाल्याचा आरोप महाविकास आगाडीकरून करण्यात येत आहे. यावर बोलताना ईडी,cbi ही कारवाई काही फक्त आमच्याच काळात झाली का? लालूप्रसाद, मोदी, अमित शाह, कलमाडी, अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाली तेव्हा आम्ही होतो का काँग्रेस हे विसरलेत का? असा सवाल दावेंनी मलिकांच्या अकेवरून विचारलाय. तर हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे. जर गुन्हेगार नसाल तर कोर्टात सिद्ध करा. तक्रारी येतात म्हणून तर चौकशी होते. असे ते म्हणाले आहेत.

पायात पाय अडकून पडतील

तसेच आम्हाला राष्ट्रपती राजवट आणण्याची अजिबात इच्छा नाही. हे अमर,अकबर,अँथनीचे सरकार आहे. पायात पाय अडकून पडतील, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. मस्ती आल्यासारखी भाषा मलिकांना आली, ज्यांनी दाऊ ची प्रॉपर्टी घेतली त्याच्यासाठी ncp आंदोलन करत आहे. याचा अर्थ असा समजायचा का? की ncp चा दाऊदच्या प्रकरणाला पाठिंबा आहे, असा सवालही त्यांनी केला आहे, तसेच आता बाळासाहेबांसारखी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेणं अपेक्षित आहे. बाळासाहेबांनी जनतेची बाजू घेतली होती, तीच अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून आहे, असेही ते म्हणालेत.

विद्यार्थ्यांबाबत काय म्हणाले?

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. युक्रेन आणि रशियात अडकलेले विद्यार्थी त्यांना भारतात आणणे प्राधान्य आहे. पंतप्रधानांनी यावर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. 4 मंत्री या देशांच्या लगत देशांत ठाण मांडून बसलेत असेही त्यांनी सांगितले. तसेच उद्या रात्री 1 विमान आणखी येणार आहे. भारतीयांना वाचविण्यासाठी भारताचे ऑपरेशन गंगा सुरू आहे. प्रधानमंत्र्यांनी भारतीयांना वाचविण्यासाठी काही मंत्र्यांची नियुक्ती केली. विद्यार्थ्यांनी भारत सरकारच्या हेल्पलाईनला संपर्क साधावा, अडकलेल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

volodymyr zelensky : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात “झुकेगा नाहीं साला”, बलाढ्य रशियाला थोपवणारा जिगरबाज नेता

Swami Prasad Maurya : उत्तर प्रदेशात तणाव; सपाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य यांच्या कारवर दगडफेक

यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यात सौंदर्यावरून जुंपली! राणांच्या टीकेला ठाकुरांचं प्रत्युत्तर

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.