खूशखबर! नाशिकमध्ये नोकर भरती मेळावा; 4 ऑक्टोबरला आयोजन

सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 ऑक्टोबर रोजी नोकर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

खूशखबर! नाशिकमध्ये नोकर भरती मेळावा; 4 ऑक्टोबरला आयोजन
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 3:15 PM

नाशिकः सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 ऑक्टोबर रोजी नोकर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिकाऊ उमेदवारी या योजनेंतर्गत हा मेळावा होतोय. सातपूरच्या त्र्यंबकरोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी साडेनऊ वाजता मेळावा सुरू होईल. या मेळाव्यासाठी आयटीआय उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. उमेदवारांनी आपले आधार कार्ड, दहावी, सर्व सत्रांची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सोबत आणाव्यात, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार रमाकांत उनवणे यांनी केले आहे. दरम्यान, यापूर्वी 27 सप्टेंबर रोजीही नाशिक जिल्ह्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राकडून दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील उद्योग समूह सहभागी झाले. नाशिकच्या डब्ल्यूएनएस ग्लोबस सर्व्हिसेसमध्ये अप्रेंटिसच्या 10 जागा भरल्या. नाशिकच्याच श्रद्धा मोटर इंडस्ट्री प्लांटमध्ये 2 फीटर, 8 वेल्डर आणि 1 जागा इलेक्ट्रीशियनची जागा भरण्यात आली. तर नाशिकच्याच डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेसने बी. कॉम आणि बीबीए उत्तीर्णांच्या 100 आणि एमबीएच्या 100 जागांसाठीची संधी उमेदवारांनी दिली होती.

सेवायोजन कार्यालयामध्ये करा नोंदणी

सातपूरच्या रोजगार मेळाव्याचा अपवाद वगळता इतर रोजगार मेळाव्यातील नोकरीची संधी मिळवण्यासाठी संबंधित उमेदवाराची सेवायोजन कार्यालयामध्ये नोंदणी असणे गरजेचे आहे. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या वेबपोर्टलवर लॉग इन करावे. त्यानंतर जॉब फेअर टॅबरवर क्लिक करावे. यात NASHIK ONLINE JOB FAIR-6 (2021-22) या भागाची निवड करावी. या भागात उमेदवाराने आपल्या पात्रतेप्रमाणे रिक्त जागांसाठी अर्ज करावा. काही अडचण आल्यास 0253-2972121 या क्रमांकावर कार्यालय वेळेत संपर्क साधावा.

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले कोरोनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांच्या नोकऱ्या व रोजगार गेले आहेत. विविध कंपन्यांनी उत्पादनात कपात झाल्यामुळे कर्मचारी वर्ग कमी तरी केला किंवा त्यांना काही दिवसांच्या सुट्टीवर पाठवले होते. आता कोरोनाची तिसरी लाट यायची शक्यता कमी दिसते आहे. कोरोना रुग्णही आटोक्यात आहेत. त्यामुळे कंपन्यांचे गाडे रुळावर आले असून, पुन्हा एकदा नोकर भरती सुरू झाली आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.(Recruitment meet in Nashik; Held on 4 October)

इतर बातम्याः

भुजबळ धमकीप्रकरणी दूध का दूध पानी का पानी होणार; आमदार कांदेंसह छोटा राजनच्या पुतण्याला समन्स

आयपीएल बुकीची ‘माया’ पडली महागात; 30 लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिकमध्ये बेड्या

आई राजा उदो उदो: नवरात्रोत्सवात वणीचे सप्तश्रृंगी मंदिर 24 तास सुरू; यात्रा रद्द, दर्शनासाठी कडक नियम

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.