नाशिकमध्ये महसुली कामकाजाची होणार तपासणी; विभागीय आयुक्तांचे आदेश, अनेकांचे धाबे दणाणले

नाशिक विभागातील महसुली आणि दंडाधिकारी कामकाजाची सखोल तपासणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

नाशिकमध्ये महसुली कामकाजाची होणार तपासणी; विभागीय आयुक्तांचे आदेश, अनेकांचे धाबे दणाणले
राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 6:13 PM

नाशिकः नाशिक विभागातील महसुली आणि दंडाधिकारी कामकाजाची सखोल तपासणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

महसूल विभागाच्या कामकाजात अधिकाअधिक पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी,अपर जिल्हाधिकारी , प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार यांच्यापासून मंडळ अधिकारी यांनी पारित केलेल्या जमीन विषयक कायदया अंतर्गतचे न्याय निर्णय आणि दंडाधिकारी कामकाजाची तपासणी व छानणी आता होणार आहे. जिल्हा, तालुका व गावपातळीवर शासनाचा महत्त्वपूर्ण विभाग असलेल्या महसूल खात्याकडे जमीन विषयक प्रकरणी न्यायनिवाडा करणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, यासारखी अनेक महत्त्वाची कामे सोपविण्यात आलेली आहेत. या कामांची तपासणी व छानणी करण्याची कार्यवाही आता हाती घेण्यात आली आहे. याद्वारे जमीन विषयक आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना महसूल अधिकाऱ्यांनी पारित करण्यात आलेले आदेश गुणात्मक व कायदेशीर आहेत का, याची आता खातरजमा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रकरण दाखल झाल्यापासून योग्य रितीने सुनावणी घेऊन आदेश पारित करेपर्यंत सर्वच टप्प्यावर कायद्याच्या कसोटीवर उतरणारी कार्यवाही होत आहे की नाही, याची खात्री केली जाणार आहे. जमीन विषयक प्रकरणे आणि कायदा व सुव्यवस्था हे दोन्हीही विषय शासनाच्या कामकाजाचे प्रतिबिंब असल्याने याकामी आता विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

पथकाची स्थापना

आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नाशिक विभागीय आयुक्त स्तरावर प्रत्येक जिल्ह्यासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर त्यांच्या मदतीला दोन ते तीन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी कामकाज पाहतील. सामान्य व्यक्ती तसेच वादी व प्रतिवादी यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रे व पुरावे आणि प्रकरणात झालेली सुनावणी याचे प्रतिबिंब न्याय निर्णयात उमटले पाहिजे, अशी अपेक्षा या तपासणी पथकाच्या निर्मितीमागे आहे.

पाच जिल्ह्यात काम केले सुरू

महसूल विभागाकडे असलेल्या कायदा व सुव्यवस्था राखतांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व आदेशांची ही ठराविक संख्येच्या प्रमाणात छानणी करण्यात येणार आहे. नाशिक विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात या तपासणी पथकाने आपले कामकाज सुरू केले असून, याचे चांगले परिणाम लवकरच दिसून येतील, अशी आशा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केली.

इतर बातम्याः

दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी नाशिक सराफा सज्ज; शुद्ध चांदीच्या सुबक मूर्ती फक्त 30 ग्रॅमपासून

Special Report: गडकरींचा देशीवाद, गाईचे शेण अन् आकाशवाणीची धून!

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा; उत्तर महाराष्ट्रात 5210 शाळा सुरू, प्रवेशोत्सव सोहळा रंगला!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.