VIDEO: ओबीसींचं रस्त्यावर झोपून आंदोलन, शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड; नाशिकच्या द्वारका चौकाला छावणीचं स्वरुप

ओबीसींच्या आरक्षणासाठी आज नाशिकच्या द्वारका चौकात ओबीसी संघटना आणि समता परिषदेने जोरदार आंदोलने केली. आंदोलकांनी रस्त्यावर झोपून जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली. (obc reservation)

VIDEO: ओबीसींचं रस्त्यावर झोपून आंदोलन, शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड; नाशिकच्या द्वारका चौकाला छावणीचं स्वरुप
OBC aaksrosh Morcha
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 3:10 PM

नाशिक: ओबीसींच्या आरक्षणासाठी आज नाशिकच्या द्वारका चौकात ओबीसी संघटना आणि समता परिषदेने जोरदार आंदोलने केली. आंदोलकांनी रस्त्यावर झोपून जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली. यावेळी शेकडो आंदोलक जमल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. तसेच या परिसरात कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे द्वारका चौकाला छावणीचं स्वरुप आलं होतं. (samata parishad activists protest in nashik for obc reservation)

आज सकाळी 10 वाजताच आंदोलक द्वारका चौकात पोहोचले होते. नाशिक शहरातील द्वारका चौकात जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र निदर्शने करत रास्ता रोको केला. आंदोलकांनी सुरुवातीला द्वारका चौकात घोषणाबाजी केली. नंतर जमाव प्रचंड जमल्याने रास्तारोको करण्यात आला. तेव्हा पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी रस्त्यावर झोपून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड सुरू केली.

यावेळी ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणना करण्यात यावी यासह विविध न्याय मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे व कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर काही काळाने त्यांची सुटका देखील करण्यात आली.

‘न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींच पक्के आहे’

ओबीसी संघटनांनीओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन करत नाशिकसह राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको केला. नाशिकमध्ये तर आंदोलकांनी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. यावेळी आंदोलकांनी ‘ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे’, ‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, ‘ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘जय ज्योती, जय क्रांती’, ‘ओबीसीचे राजकीय आरक्षण, हा आमचा हक्क आहे’, ‘न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींच पक्के आहे’, ‘ओबीसी आरक्षणाचा हक्काचा वाटा, केंद्र सरकार लवकर द्या इंपेरिकल डाटा’, ‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी, नही चलेगी’, ‘ओबीसींच्या आरक्षणाला जाऊ देऊ नका तढा, ओबीसी आक्रोश आता देशव्यापी लढा’ आदी घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

तोपर्यंत लढाई सुरूच राहील

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवीत आहोत. आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. ओबीसींच्या मागण्याबाबत सुरू केलेली ही आमची रस्त्यावरची लढाई ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहील, असा इशारा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिला. (samata parishad activists protest in nashik for obc reservation)

संबंधित बातम्या:

OBC Morcha : नाशिकमध्ये ओबीसी आक्रोश मोर्चा, आरक्षण वाचवण्यासाठी समाज रस्त्यावर

2024 चं शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं? कुणाची गोची, कुणाला संधी? काय असू शकतं सत्तेचं गणित? वाचा सविस्तर

मोठी बातमी : एकीकडे मराठा मोर्चाचा हुंकार, दुसरीकडे OBC संघटनांचा एल्गार, उद्यापासून महिनाभर आंदोलन

(samata parishad activists protest in nashik for obc reservation)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.