कुबेरांच्या ‘रेनेसान्स स्टेट: द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडची पुन्हा मागणी

'रेनेसान्स स्टेट: द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे.

कुबेरांच्या ‘रेनेसान्स स्टेट: द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घाला; संभाजी ब्रिगेडची पुन्हा मागणी
Renaissance State
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 5:46 PM

नाशिक: ‘रेनेसान्स स्टेट: द रिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

गिरीश कुबेर यांनी ‘रेनेसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. स्वतःच्या पुस्तकांमध्ये सोयराबाई महाराणी साहेब यांचा खून संभाजीराजांनी केला… अशा पद्धतीचे वादग्रस्त व संतापजनक लिखाण गिरीश कुबेर यांनी केलं आहे. त्यांनाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी साहित्य संमेलनातील एका परिसंवादाचे अध्यक्षपद दिलं आहे. यापेक्षा बदनामीचे समर्थन दुसरं कुठलंही असू शकत नाही, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

तर संमेलन बंद केलं पाहिजे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमची चाचपणी करत आहे. बाकीचे सगळे स्वयंघोषित पुरोगामी त्यांचे हस्तक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेडसह सर्व शिवप्रेमींनी गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर बंदी घालावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून गेल्या सहा महिन्यापासून प्रचंड तक्रारी करून सुद्धा कुबेरांवर गुन्हा दाखल केला नाही. तरीही आज नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कुबेरांना परिसंवादाचे अध्यक्ष देणे निषेधार्ह आहे. कदाचित वादग्रस्त लिखाणाची ही शाब्बासकी असेल. हे असले साहित्य संमेलन नुसते रद्द करून चालणार नाहीत तर ते बंद केले पाहिजेत. त्यामुळेच कुबेर यांना काळं फासून संभाजी ब्रिगेडच्या शिवप्रेमींनी दिलेली ही वैचारिक प्रतिक्रिया आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

दाद कुणाकडे मागायची?

छत्रपतींची बदनामी ही याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात का सहन करायची? बदनामी करणाऱ्याला जर सरकार पाठीशी घालणार असेल तर दाद कोणाकडे मागायची…? त्यासाठी संघर्ष करावा लागेल. सरकारने तात्काळ ‘रेनेसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सरकारला इशारा दिला होता

कुबरे यांच्या तोंडाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ठिकाणी संभाजी ब्रिग्रेडने काळ फासलं आहे, कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकातून संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिग्रेडचे प्रदेशअध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे. कुबेर यांच्या पुस्तकामधील विकृत लिखाण 03 जून 2021 रोजी आम्ही शासनाच्या निर्दशनास आणून दिल होतं. हे पुस्तक त्वरीत मागे घ्यावे, कुबेर यांनी माफी मागावी असं आवाहन आम्ही महाराष्ट्र सरकारला केलं होतं. मात्र सरकारने याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप आखरे यांनी केला आहे. तर, कुबेर यांच्या तोंडाला काळे फासण्याच्या घटनेचं आम्ही समर्थन करतो. सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी अशी आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

Girish kuber : हे लिहल्यामुळे गिरीश कुबेरांवर नाशकात शाईफेक, काय होता मजकूर? वाचा सविस्तर

Nashik : संभाजी ब्रिगेड निवेदनातून नाराजी व्यक्त करेल वाटलेलं, शाईफेकीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Sahitya Sammelan: ही तर संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया; प्रवीण दरेकरांकडून कुबेरांवरील शाईफेकीचं अप्रत्यक्ष समर्थन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.